ठाणे जि.प. अध्यक्षपद, शहापूर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी तर मुरबाड सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 03:26 PM2017-12-18T15:26:28+5:302017-12-18T15:32:35+5:30

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असल्याने शहापूर पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Thane district Chairman for Scheduled Tribes | ठाणे जि.प. अध्यक्षपद, शहापूर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी तर मुरबाड सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी

ठाणे जि.प. अध्यक्षपद, शहापूर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी तर मुरबाड सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी

Next

ठाणे - ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असल्याने शहापूर पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित ४ पंचायत समिती सभापती पदांपैकी मुरबाड पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. आज जिल्हा नियोजन सभागृहात आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर काढण्यात आली. यावेळी प्रथम उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी १६ जून २०१६ च्या शासन अधिसूचनेची तसेच सोडतीच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली.

मुरबाड मध्ये सर्वाधिक म्हणजे २७.१७ टक्के अनुसूचित जमितीची लोकसंख्या असल्याने येथील पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यानंतर उर्वरित पंचायत समित्यांसाठी एका मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामध्ये अंबरनाथ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), भिवंडी हे सर्वसाधारण महिलांसाठी, तर कल्याण हे सर्वसाधारण गटासाठी असे आरक्षण काढण्यात आले.

शेवटी तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांनी आभार मानले. सोडतीच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तहसीलदार स्मिता मोहिते, श्री पष्टे यांनी प्रयत्न केले. 

Web Title: Thane district Chairman for Scheduled Tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे