स्वच्छता पंधरवड्याकडे एनजीओंची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:47 AM2018-09-21T02:47:37+5:302018-09-21T02:47:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Text of NG to cleanliness fortnight | स्वच्छता पंधरवड्याकडे एनजीओंची पाठ

स्वच्छता पंधरवड्याकडे एनजीओंची पाठ

googlenewsNext

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, देशभर पंधरवडा सुरू झाला आहे. अशा कार्यक्र मांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सामाजिक संस्थांपैकी एकही संस्था (एनजीओ) या पंधरवड्यास पाच दिवस उलटले, तरी अद्यापही ठाणे रेल्वेस्थानकात सहभागी झालेली नाही. एनजीओ सोडाच स्थानिक खासदारांसह भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे अजून आठ ते दहा दिवस हे अभियान सुरू राहणार असल्याने आता तरी ठाण्यातील सामाजिक संस्थांनी या उपक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघटनांसह रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ
रेल्वे, स्वच्छ भारत असा नारा
देऊन स्वच्छता पंधरवडा आयोजिला आहे. त्यानुसार, इतर रेल्वेस्थानकांप्रमाणे ठाणे रेल्वेस्थानकातही या अभियानास सुरुवात झाली आहे. सामाजिक संस्था पुढे येत नसल्याने रेल्वे कर्मचाºयांमार्फत रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मध्यंतरी, अस्वच्छतेच्या टॉप टेन यादीत ठाण्याचे नाव आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. वेळप्रसंगी अस्वच्छता ठेवणाºया प्रवाशांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.
एरव्ही, शासनामार्फत
एखादे अभियान राबवत येते, तेव्हा सामाजिक संस्था त्या अभियानात सहभागी होतात आणि ते अभियान यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात हातभार लावतात. मात्र, ठाण्यात सध्या सुरू असलेल्या पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानात हे चित्र उलटे दिसत आहे.
>एका संस्थेकडून विचारणा
एका संस्थेने सुरुवातीला विचारणा केली होती. मात्र, त्यानंतर तिनेही चक्क पाठ फिरवल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. दुसरीकडे काही राजकीय पक्ष ठाण्यातील या संस्थांना या अभियानापासून लांब राहण्याबाबत समर्थन करत तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Text of NG to cleanliness fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.