अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण तीन वर्षांनंतर बोलू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 03:55 PM2018-05-03T15:55:04+5:302018-05-03T15:55:04+5:30

दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे .

A teenager who tried to commit suicide after drinking acid began to speak three years later | अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण तीन वर्षांनंतर बोलू लागला

अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण तीन वर्षांनंतर बोलू लागला

- धीरज परब 

मीरारोड - दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . 

सिल्वासा येथे राहणारा मनीष हा २०१५ साली दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता . वडील देवूभाई  हे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत असल्याने मनीष कडून सर्वाना अपेक्षा होत्या . पण दहावीत नापास झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनीष ने एसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला .  त्यावेळी त्यावर तात्काळ उपचार झाल्यामुळे त्याचा जीव वाचला पण त्याची वाचा कायमची गेली होती व तो बोलू शकत नव्हता. 

 

सिलवासा  येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये आयोजित एका मोफत वैद्यकीय तपासणी दरम्यान वोक्हार्ट रुग्णालयाच्या कान  नाक व घशाच्या तज्ञ डॉ. नीपा वेलीमुट्टम यांची भेट झाली असता त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाची व्यथा सांगितली.  

 

डॉ निपा यांनी त्यांना मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला. वोक्हार्ट मध्ये आल्यावर मनीषच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यावर त्याच्यावर शल्यचिकित्सा करण्याचे ठरविले. " ऍसिडमुळे मनीषच्या  श्वासनलिकेला दुखापत झाली होती व ती अरुंद बनली होती त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी  अडथळा येत होता.  सिलवासा येथील डॉक्टरांनी  ट्राचेओस्टोमी  करून श्वसनासाठी त्यांच्या मानेला एक छिद्र केले होते, या प्रक्रियेमुळे तो श्वास घेऊ शकत होता पण त्याला बोलण्यास अडथळा येत होता.  

याबाबत  वोक्हार्टचे कर्करोग तज्ञ  डॉ. कृथार्थ ठाकर व भूलतज्ञ  डॉ. विनिता संगई यांच्याशी वैद्यकीय सल्ला मसलत  करून मनीषच्या श्वासनलिकेवर  शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. या शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या श्वासनलिकेचा  खराब झालेला  भाग काढून तो पूर्ववत जोडण्यात आला.  त्यामुळे त्याच्या स्वर नलिकेला  ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो परत  बोलू लागला. 

अशा प्रकारची शल्यचिकीत्सा हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात कठीण शल्यचिकित्सा समजली जाते  व त्यासाठी आधुनिक वैद्यकिय तंत्रज्ञान  उपलब्ध असणे फार गरजेचे असते असे  डॉ. नीपा वेलीमुट्टम म्हणाल्या .   भारतामध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरीही त्यांची व्याप्ती तळागाळातील लोकांपर्यंत तितकी पोहचत नसल्याचे त्या म्हणाल्या . केंद्रशासनाच्या संजीवनी योजनेतून हि शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले .  

मनीषच्या समस्येचे निराकरण कदाचित २ वर्षांपूर्वीच झाले असते परंतु  सिलवासा येथे आधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या उपचारास विलंब लागला, परंतु आता मनीष बोलू शकतो याचा आम्हाला  आनंद आहे असे मत मनीषचे  वडील देवूभाई यांनी व्यक्त केले.  

Web Title: A teenager who tried to commit suicide after drinking acid began to speak three years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.