‘टेक्निकल टास्क फोर्स’ कागदावरच, जाचक अटींमुळे वाजला बो-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:53 AM2017-10-01T00:53:52+5:302017-10-01T00:54:07+5:30

कळवा-दिवादरम्यान जानेवारी २०१५मध्ये झालेल्या प्रवाशांच्या हिंसक आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विभागीय टेक्निकल टास्क फोर्स अर्थात विशेष तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती.

On the 'Technical task force' paper, due to poor terms, boo | ‘टेक्निकल टास्क फोर्स’ कागदावरच, जाचक अटींमुळे वाजला बो-या

‘टेक्निकल टास्क फोर्स’ कागदावरच, जाचक अटींमुळे वाजला बो-या

Next

- नारायण जाधव ।

ठाणे : कळवा-दिवादरम्यान जानेवारी २०१५मध्ये झालेल्या प्रवाशांच्या हिंसक आंदोलनानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई विभागीय टेक्निकल टास्क फोर्स अर्थात विशेष तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु, रेल्वे बोर्डाने लादलेल्या जाचक अटींमुळे हे पथक अद्यापही कागदावरच आहे. परिणामी, मुंबई लोकल सेवेसह रेल्वेच्या पायाभूत आणि तांत्रिक समस्या सुटल्या नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. परळ-एल्फिन्स्टन दरम्यानच्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर पुन्हा तांत्रिक कार्य पथक स्थापन करण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. मात्र जोवर रेल्वे बोर्डाच्या हटवादी नोकरशहांकडून जाचक अटींचा अडसर दूर केला जात नाही. तोपर्यंत हे पथक स्थापन होऊच शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
शुक्रवारच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांना जीव गमवावा लागल्यानंतर पुन्हा तांत्रिक कार्य पथकाचा विषय उपस्थित झाला. जानेवारी २०१५मध्ये सुरेश प्रभू यांनी या पथकाच्या स्थापनेची घोषणा केली होती. डिसेंबर २०१६मध्ये रेल्वे मंत्रालयात जपानच्या रेल्वे टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कोरियन रेल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा झाली होती. या बैठकीत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासमवेत प्रभू यांनी संवाद साधला होता. त्यानंतर केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील रेल्वेच्या सुरक्षेसाठी विशेष तांत्रिक पथक स्थापनेसंदर्भात रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला. परंतु, या पथकातील ४२०० बेसिक पगार असणारे तंत्रज्ञ हे कोणत्याही रेल्वे युनियनचे सदस्य असता कामा नयेत, अशी अट घातली गेली. तसेच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यात घेण्याची अट होती. याला इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशनने तीव्र विरोध करून फेबु्रवारी २०१७मध्ये तसे पत्र रेल्वेमंत्र्यांना धाडले होते. आमच्या असोसिएशनचे ५० हजारांहून अधिक सक्रिय तंत्रज्ञ असताना केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची मदत का घ्यायची, असा त्यांचा सवाल होता. या आणि अशा अनेक जाचक अटींमुळे तांत्रिक कार्य पथक कागदावरच राहिले.

...तरीही सेवा अविरत सुरू
मुंबईची उपनगरीय लोकल ही केवळ मुंबई शहरापुरती
मर्यादित नसून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नऊ महापालिका आणि सात नगरपालिका क्षेत्रांसह पालघर-डहाणूपासून कसाºयापर्यंतच्या प्रवाशांचा तिच्याशी थेट संबंध आहे. दररोज ७५ लाख प्रवासी लोकलने ये-जा करतात. शिवाय मध्य आणि पश्चिम मार्गावरील लांब पल्ल्याच्या अनेक प्रवासी गाड्यांसह मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. अपुºया पायाभूत सुविधा, तांत्रिक समस्यांना तोंड देऊन ही सेवा अविरत सुरू असते.

Web Title: On the 'Technical task force' paper, due to poor terms, boo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.