अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या मनपाच्या पथकास मिळाले प्लास्टिक साठ्याचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:10 PM2019-03-01T22:10:21+5:302019-03-01T22:13:04+5:30

भिवंडी : शहरातील कल्याणरोड येथील शफीक कंपाऊण्ड येते अनाधिकृत इमारतीवर कारवाई करण्यास गेलेल्या इमारतीत शासनाने प्रतिबंधीत केलेल्या प्लास्टीकचा सुमारे ...

A team of corporators who went to break the unauthorized construction got the plastic frozen stink | अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या मनपाच्या पथकास मिळाले प्लास्टिक साठ्याचे घबाड

अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या मनपाच्या पथकास मिळाले प्लास्टिक साठ्याचे घबाड

Next
ठळक मुद्दे मनपाचे अतिक्रमण पथक गेले होते तोडू कारवाई करण्यासाठीव्यावसायीक गाळ्यात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या प्लास्टिक वस्तू सहा टन प्लास्टिक वस्तू जप्त पण फौजदारी कारवाई नाही

भिवंडी : शहरातील कल्याणरोड येथील शफीक कंपाऊण्ड येते अनाधिकृत इमारतीवर कारवाई करण्यास गेलेल्या इमारतीत शासनाने प्रतिबंधीत केलेल्या प्लास्टीकचा सुमारे सहा टन पिशव्या व इतर वस्तूंचा साठा पकडला. या घटनेने शहरात खळबळ माजली असून महानगरपालिकेच्या करमुल्यांकन विभागाने आद्याप संबधितांवर फौजदारी कारवाई न केल्याने शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
कल्याणरोड येथे शफीक कंपाऊण्डमध्ये हनुमंत बनारसी याने अनाधिकृत इमारत असुन या इमारतीवर तोडू कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे प्रमुख शाकीब खर्बे हे आपल्या पथकासह काल गुरूवार रोजी दुपारनंतर गेले होते. त्या इमारतीत तळमजल्यावर तय्यब मुमताज अहमद अन्सारी याच्या मालकीचे दुकान बंद अवस्थेत होते. पथकाने तोडू कारवाई सुरू केली असता त्या व्यावसायीक गाळ्यात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या,प्लास्टिकचे ग्लास व इतर प्लास्टिकच्या वस्तू सापडल्या. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी करमुल्यांकन विभागास दिल्यानंतर घटनास्थळी करमुल्यांकन विभागातील सहा.आयुक्त दिलीप खाने यांनी पाच लाख रूपये किंमतीचा सहा टन माल जप्त केला. तसेच हा माल पालिकेच्या भांडारगृहात जमा केला. त्यानंतर ही इमारत निष्कासीत करण्याची कारवाई करण्यात आली. मात्र अवैधरित्या प्लास्टिकचा साठा करणाºया तय्यब अन्सारी विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. काही महिन्यापुर्वी सोनाळे गावात दोन प्लास्टिकच्या पिशव्यांचे उत्पादन करणाºया कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कल्याणरोड भागात हा साठा मिळाल्याने सरकारी यंत्रणेने या भागातील इतर बंद गाळ्यांना लक्ष केले आहे.

Web Title: A team of corporators who went to break the unauthorized construction got the plastic frozen stink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.