मुंबईसह ठाण्यातून तडीपार केलेल्या गुंडाला काशीमीरा भागातून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 23, 2018 21:19 IST2018-10-23T21:13:38+5:302018-10-23T21:19:33+5:30

मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी मुंबई आणि ठाणे जिल्हयातून तडीपार केलेल्या आशिष उर्फ बंटी चौबे याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने काशीमीरा भागातून अटक केली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Tadipa accused arrested from Kashimira area by Thane rural police | मुंबईसह ठाण्यातून तडीपार केलेल्या गुंडाला काशीमीरा भागातून अटक

हाणामारीसह अनेक गुन्हे दाखल

ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईदोन वर्षांसाठी केले हद्दपारहाणामारीसह अनेक गुन्हे दाखल

ठाणे: मुंबई ठाण्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आशिष उर्फ बंटी अरविंद चौबे (३०, मीरा रोड, ठाणे) याला काशीमीरा भागातून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. त्याच्यावार हाणामारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
चौबे याला मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या परिमंडळ १२ चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी हद्दपार केले आहे. तो आपले अस्तित्व लपवून काशीमीरा भागातील क्लस्टर क्रमांक एक भागात फिरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना मिळाली होती. त्या आधारे २२ आॅक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या बडाख यांच्या पथकाने चौबेला अटक केली. पोलीस पथकाला पाहून त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध दंगल, विनयभंग आणि हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध १४२ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

Web Title: Tadipa accused arrested from Kashimira area by Thane rural police