स्थायीसह, प्रभाग व महिला, बाल कल्याण समिती सभापती निवडणूक १८ नोव्हेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 07:55 PM2017-11-14T19:55:37+5:302017-11-14T19:55:49+5:30

 मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला  पार पडणार आहे. या समित्यांतील ८ सभापतीपदासाठी एकूण २३ तर महिला बाल व कल्याण समिती उपसभापतीपदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज मंगळवारी नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांच्याकडे दाखल करण्यात आले. 

Standing Committee, Women and Child Welfare Committee, will be elected on 18th November | स्थायीसह, प्रभाग व महिला, बाल कल्याण समिती सभापती निवडणूक १८ नोव्हेंबरला

स्थायीसह, प्रभाग व महिला, बाल कल्याण समिती सभापती निवडणूक १८ नोव्हेंबरला

Next

- राजू काळे 

भाईंदर :  मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला  पार पडणार आहे. या समित्यांतील ८ सभापतीपदासाठी एकूण २३ तर महिला बाल व कल्याण समिती उपसभापतीपदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज मंगळवारी नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांच्याकडे दाखल करण्यात आले. 

यंदाच्या निवडणुकीत सर्वच समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असल्याने त्यातील सभापतीपद भाजपालाच मिळणार असून महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापतीपदही भाजपाच्याच वाट्याला जाणार आहे. तत्पुर्वी एकूण सहा प्रभाग समित्यांतील प्रभाग रचनेचा प्रस्ताव प्रशासनाकडून १६ आॅक्टोबरच्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यावेळी प्रभाग समिती ३ मध्ये प्रभाग समिती ४ अंतर्गत असलेला प्रभाग १० समाविष्ट करण्याची सूचना सेनेच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. यामुळे भाजपाची सदस्य संख्या कमी होऊन त्यात सेनेचे वर्चस्व वाढणार असल्याचे लक्षात येताच भाजपाने त्याला त्याला विरोध करुन प्रशासनाचा प्रभाग समिती ३ व ४ चा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर जैसे थे ठेवला. यामुळे प्रभाग ३ मधील सेनेच्या वर्चस्वाची खेळी धुळीला मिळून त्यावर भाजपाचेच वर्चस्व कायम राहिले. तसेच मीरारोडमधील प्रभाग समिती ५ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाने काँग्रेसचे बालेकिल्ले ठरलेले प्रभाग ९ व १९ प्रभाग ५ मधून थेट प्रभाग समिती ६ मध्ये समाविष्ट करण्याचा ठराव मांडला. त्याला भाजपाने बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याने काँग्रेसचे प्रभाग ५ मधील सभापतीपदावरील दावा धुळीस मिळाला. उर्वरीत प्रभाग समिती १ व २ मध्ये भाजपाचेच वर्चस्व असल्याने त्यासह सर्वच प्रभागांत भाजपाचेच सभापती विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीतही एकूण १६ सदस्यांपैकी भाजपाचे १० सदस्य असल्याने सर्व समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व राहणार आहे. या समित्यांच्या सभापतीपदासह महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदाची निवडणुक येत्या १८ नोव्हेंबरला पार पडणार असुन  त्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे पीठासीन अधिकारी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. निवडणुकांना सकाळी ११ वाजल्यापासुन सुरुवात होणार आहे. स्थायीसाठी भाजपाचे ध्रुवकिशोर पाटील तर सेनेच्या तारा घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग समिती १ साठी भाजपाचे जयेश भोईर व सेनेचे बांड्या एलायस, प्रभाग २ साठी भाजपाचे डॉ. राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या प्रभागातील निवडणुक बिनविरोध ठरली आहे. प्रभाग ३ साठी भाजपाचे गणेश शेट्टी तर सेनेच्या अर्चना कदम, ४ साठी भाजपाचे संजय थेराडे तर सेनेच्या स्रेहा पांडे, ५ साठी भाजपाचे अश्विन कासोदरिया तर काँग्रेसच्या उमा सपार व ६ साठी भाजपाचे आनंद मांजरेकर तर सनेचे कमलेश भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाच्या  शानू गोहिल तर काँग्रेसच्या रुबीना शेख व उपसभापतीसाठी भाजपाच्याच सीमा शाह तर सेनेच्या कुसूम गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

Web Title: Standing Committee, Women and Child Welfare Committee, will be elected on 18th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.