एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी; इटंकची मागणी

By अजित मांडके | Published: February 5, 2024 03:29 PM2024-02-05T15:29:30+5:302024-02-05T15:29:54+5:30

विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की  ४०० यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते.

ST Corporation should urgently recruit mechanical staff | एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी; इटंकची मागणी

एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी; इटंकची मागणी

ठाणे :  ठाणे एसटीच्या विभागीय कार्यशाळेत म्हणजेच यांत्रिक विभागात ४०० पैकी अवघे १०० कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांवरील कामाचा ताण अधिक वाढला असून या विभागातील कर्मचाºयांची भरती करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. महामंडळाने तातडीने लक्ष देउन यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस युनियन च्या ठाणे विभागा वतीने ठाणे विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.

विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की  ४०० यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते. आज परिस्थिती अशी आहे की त्यापैकी फक्त १०० च्या आसपास कर्मचारी उरलेले  आहेत. दरम्यान च्या काळात अनेकजण सेवानिवृत्त झाले ,काहींनी दुसऱ्या विभागात बदली घेतली,काही महत्त्वाचे असे यांत्रिक विभाग असे आहेत की तिथे दोन ते तीनच कर्मचारी उरलेले आहेत. यांत्रिक काम हे पार काटेकोरपणे केले जाते त्यात यांत्रिक काम प्रचंड अंगमेहनतीचे असुन कमी मनुष्यबळात दडपशाही करुन प्रशासनाकडून ते करून घेतले जाते, काही कारणास्तव नियोजित काम वेळेवर झालं नाही तर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य त्यामुळे खचलेले आहे. महामंडळाने यांत्रिक विभाग कधीच अद्यवत करण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला किंबहुना यांत्रिक विभाग हा एसटीतील महत्त्वाचा विभाग असताना तो नेहमी दुर्लक्षितच राहिलेला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एस टी.वर्कर्स काँग्रेसचे ठाणे विभाग अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे.

आगार पातळीवर ही कर्मचारी फार कमी प्रमाणात आहेत. उरलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्ती कडे झुकलेले आहेत.
यांत्रिक विभागात तातडीने नोकर भरती करणे गरजेचे असल्याचे इंटक ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाल्याचे  शिंदे यांनी सांगितले व यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ठाणे विभाग नियंत्रकांनी  पुढे प्रयत्न करावेत यासाठी निवेदन देत असून यांत्रिक भरतीचा प्रश्न राज्यात सर्वत्रच सारखा असुन इंटक सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल अशा इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.

Web Title: ST Corporation should urgently recruit mechanical staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे