करवाढ रद्द करण्याची शिवसेना, मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:23 AM2018-02-19T00:23:56+5:302018-02-19T00:23:59+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरित मागे घेण्यात यावी

Shiv Sena, MNS demand to revoke the increase | करवाढ रद्द करण्याची शिवसेना, मनसेची मागणी

करवाढ रद्द करण्याची शिवसेना, मनसेची मागणी

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बी.जी. पवार यांच्याकडे केली असून करवाढ मागे न घेतल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
नवनियुक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारल्याने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सरनाईक शनिवारी पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी भरमसाट करवाढीचा बोजा नागरिकांच्या शिरावर टाकण्यात येत असल्याबाबत आयुक्तांशी चर्चा केली. भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केल्यापासून ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे कारभार सुरू केल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले. मालमत्ताकरात सुमारे ५० टक्के दरवाढ, २ व १० रुपये प्रति एक हजार लीटरमागे पाणीपट्टीवाढ. नव्याने प्रत्येकी आठ टक्के घनकचरा शुल्क व मलप्रवाह लाभकर, पाच टक्के पाणीपुरवठा लाभकर येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजपा बहुमताच्या जोरावर लागू करण्यास अंतिम मान्यता देणार आहे. अगोदरच महागाईचा सामना करणाºयांवर हा अतिरिक्त करवाढीचा बोजा टाकू नका, असे सरनाईक यांनी त्यांना सांगितले.

मनसेनेही दिला आंदोलनाचा इशारा
मीरा-भार्इंदरचा सुधारित विकास आराखडा जाहीर होण्यापूर्वीच सर्वत्र त्याची पाने प्रसारित झाल्याबद्दल संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी. तसेच येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत भाजपाकडून आणण्यात आलेला विविध करवाढीचा प्रस्ताव रद्द करा, अन्यथा महासभेच्याच दिवशी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे मीरा-भार्इंदर शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिला आहे. उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना त्यांनी निवेदन दिले. शहर सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहराध्यक्ष हेमंत सावंत, शशी मेंडन, दिनेश कनावजे, विभागीय चिटणीस प्रमोद देठे, विभागाध्यक्ष सचिन पोपळे आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena, MNS demand to revoke the increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.