'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:43 AM2019-01-28T00:43:49+5:302019-01-28T00:44:06+5:30

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सवाल : ‘राम मंदिरच का?’ पुस्तकाचे प्रकाशन

"She was the daughter of Maharashtra, who were the brothers?" | '‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

Next

डोंबिवली : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिका नयनतारा सेहगल यांना आमंत्रण पाठवून ते नंतर नाकारले, त्यावरून बराच वाद झाला होता. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत एका व्यक्तीने मला नयनतारा या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. त्यांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही, असा मेसेज पाठवला होता. त्यावर मग पु. भा. भावे कोण होते? त्यांचे भाषण पुण्यात उधळून लावले होते. तेव्हा कोणाला का पुळका आला नाही? असा प्रश्न पडला. डावे नेहमीच आपली सोय पाहतात, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

‘पै फेण्ड्स लायब्ररी’च्या सौजन्याने नावीन्य प्रकाशन प्रकाशित डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘राममंदिरच का?’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री सभागृहात शनिवारी करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अभिनेते मनोज जोशी डॉ. परीक्षित शेवडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, पुंडलिक पै, नितीन खैर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले की, इतिहास आहे तसा लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. पण ते आपल्याकडे होत नाही. पाकिस्तानमध्ये तसे होत नाही. गेली ७० वर्षे इतिहासकारांनी घोळ घालून ठेवला आहे. तो तसाच सुरू आहे. चार वर्षांत सध्याचे सरकार ही काही करू शकले नाही. या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. मीडियाला हे सरकार घाबरते की काय असे वाटते.

परीक्षित शेवडे म्हणाले की, साहित्यातील संदर्भ पाहताना, संशोधन करीत असताना असे लक्षात येते की पुढच्या आवृत्तीमधील काही गोष्टी सोयीस्कररीत्या वगळण्यात आल्या आहेत. राजकारण हे खोलवर सुरू असते. मालिका हे इतिहास सांगण्याचे साधन नाही, पण त्यांचा बोलबोला जास्त आहे. शाळांमधूनही खरा इतिहास शिकविला जात नाही. जोशी म्हणाले की, राम या देशाची आस्था, श्रद्ध आणि या जगाचा प्राणवायू आहे. राम ज्यांच्यात नाही ते डावे आहेत आणि ज्यांच्यात राम आहे ते उजवे आहेत.

वसीम रिझवी यांचा ‘रामजन्म भूमी’ यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरला गेला आहे. लवकरच तो तुम्हाला बघायला मिळेल. रिझवी यांची मुलाखतही या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुनावणीच्या विलंबास काँग्रेस जबाबदार!
जोगळेकर म्हणाले की, जागृत जनमानस उभे राहिले तर रामजन्मभूमीवर राममंदिर बांधलेले दिसेल. भैय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत आणि जाहीर भाषणात २०२५ मध्ये मंदिर बांधलेले दिसेल. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीमधून असे पुरावे बाहेर येतील की जेणेकरून राममंदिराच्या बांधणीचा मार्ग खुला होईल.
यांच्या या वक्तव्याचा काही जणांनी हे सरकार राममंदिर बांधणार नाही असा अर्थ काढला. या सुनावणी प्रक्रियेतील ललित न्यायमूर्ती यांना काढावे, असा अर्ज काँग्रेसने केला आहे.
त्यामुळे सुनावणीला उशीर होत आहे. आता २९ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: "She was the daughter of Maharashtra, who were the brothers?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.