एटीएमला सुरक्षा, बँकांची रात्रीची सुरक्षा रामभरोसे , डोंबिवलीतील बँक व्यवस्थापनाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:16 AM2017-11-15T02:16:53+5:302017-11-15T02:17:22+5:30

जुईनगरमधील बँक आॅफ बडोदाच्या सेक्टर ११ मधील शाखेच्या लॉकर रुममध्ये फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याच्या घटनेचे गांभीर्य सोडाच पण यत्किंचीत सतर्कता डोंबिवलीतील बँकांच्या सुरक्षेबाबत दिसून आली नाही.

Security at the ATM, bank's night security Ram Bharose, Dombivli bank management complaint | एटीएमला सुरक्षा, बँकांची रात्रीची सुरक्षा रामभरोसे , डोंबिवलीतील बँक व्यवस्थापनाची तक्रार

एटीएमला सुरक्षा, बँकांची रात्रीची सुरक्षा रामभरोसे , डोंबिवलीतील बँक व्यवस्थापनाची तक्रार

Next

अनिकेत घमंडी 
डोंबिवली : जुईनगरमधील बँक आॅफ बडोदाच्या सेक्टर ११ मधील शाखेच्या लॉकर रुममध्ये फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याच्या घटनेचे गांभीर्य सोडाच पण यत्किंचीत सतर्कता डोंबिवलीतील बँकांच्या सुरक्षेबाबत दिसून आली नाही. शहरातील विविध बँकांमधील सुरक्षेचा आढावा घेण्याकरिता फेरफटका मारला असता बहुतांश बँकांच्या प्रवेशद्वारांवर अभावानेच सुरक्षा रक्षक आढळले. आमच्या बँकेची सुरक्षा राखण्याची जबाबदारी जेवढी बँक व्यवस्थापनाची आहे तेवढीच स्थानिक पोलीस यंत्रणेचीही असल्याचे अनेक बँक व्यवस्थापकांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून बँकांमध्ये पूर्वीप्रमाणे पोलीस गस्तीकरिता येत नसल्याची तक्रार बँक व्यवस्थापनाने केल्याने डोंबिवलीकरांच्या कष्टाची संपत्ती बँकांमध्ये असली तरीही असुरक्षितच आहे.
शहरातील बहुतांश बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांच्याकडे रोकड घेऊन येणाºया वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी खाजगी यंत्रणेकडे सोपवली आहे. त्यामध्ये एक-दोन शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असतात. मात्र शहरातील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कॅश व्हॅनमधून १८ लाखांची रोकड लुटल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी मानपाडा रोडवर दिवसाढवळया घडली होती. त्या गुन्ह्याची उकल अद्याप झालेली नाही. त्या पाठोपाठ आरबीएल आणि अभ्युदय बँकांची रोकड आणणाºया कॅश व्हॅन लुटायला आलेल्या पाच जणांच्या टोळीला टिळकनगर पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. टोळीतील दोघांना पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून स्क्रु ड्रायव्हर,चॉपर, अन्य शस्त्रे व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. पकडलेल्या दोन आरोपींकडून अन्य तिघांची नावे मिळाली. पण ते अद्याप फरारी आहेत. त्यातच नवी मुंबईची घटना घडल्यामुळे अनेक शहरांतील बँका असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील कॉसमॉस, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, कॉर्पोरेशन, डोंबिवली नागरी सहकारी बँक-मुख्य शाखा, अ‍ॅक्सिस बँक, भारत बँक यासह कल्याण पश्चिमेकडील बँकांशी संपर्क साधला असता अनेक महिन्यांपासून स्थानिक पोलीस गस्तीला आले नसल्याचे ठिकठिकाणच्या अधिकाºयांनी सांगितले.
ग्राहकांसह त्यांच्या संपत्तीची काळजी घेण्यासाठी या बँका, वित्त संस्थांनी त्यांच्या स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे, खाजगी सुरक्षा रक्षक, जोखमीच्या सर्व ठिकाणी अलार्म अशी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचा बँकांचा दावा आहे. केवळ स्थानिक पोलिसांवर अवलंबून राहण्यापेक्षा हे पाऊल व्यवस्थापनाने उचलल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कुठल्याच बँकांमध्ये पूर्णवेळ सुरक्षा अधिकारी नाहीत. केवळ बँकांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सुरक्षा उपलब्ध आहेत. डिएनएस बँकेमध्ये मात्र २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असून चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. आणखी काही अपवादात्मक बँकांनी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक ठेवले आहेत.
बँकेबाहेरील सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही बँकेच्या सुरक्षेसाठी नसून बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी तैनात आहोत. मात्र शेजारीच असलेल्या बँकेच्या सुरक्षेचीही काळजी वाहणे आमच्यावर बंधनकारक केले जाते. अन्य काही सुरक्षा रक्षक म्हणाले की, बँकेच्या कामकाजाच्या वेळेत आम्ही कार्यरत असतो. मात्र बँक बंद झाल्यावर आमची ड्युटी संपते. काही बँकांचे व्यवहार हे ५० लाखांच्या आत असल्याने त्यांना सुरक्षा रक्षक देता येत नसल्याचे कल्याणमधील एका बँक अधिकाºयाने सांगितले. मात्र सुरक्षेसबंधी समस्या आल्यावर हे बंधन जाचक वाटते, असे हे अधिकारी म्हणाले. पण याबाबतचा निर्णय सर्वस्वी व्यवस्थापनाने घ्यायचा आहे.
शहरातील सगळया बँकांमध्ये स्ट्राँगरुम आहे. त्या ठिकाणी जाण्यास सर्वसामान्यांसह बँकेतील कर्मचाºयांना मज्जाव असतो. मात्र एकाही बँकेच्या लॉकर्स रुममध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे नाहीत. कोण आपल्या लॉकरमध्ये काय ठेवतो यावर बँकेचे लक्ष असू नये याकरिता जरी ही व्यवस्था असली तरी जुईनगरसारखी घटना घडल्यावर लॉकर्स रुममध्ये कॅमेरे हवेत, असे बँक व्यवस्थापनाला वाटते.
जुईनगरच्या दरोड्याचे वृत्त काल वाहिन्यांवर पाहिल्यावर आणि वृत्तपत्रात वाचल्यावर मंगळवारी अनेक ग्राहकांनी विविध बँकांमध्ये जाऊन आपल्या लॉकरची पाहणी केली, असे निरीक्षण काही बँक कर्मचाºयांनी नोंदवले. बँकांत येणाºया ग्राहकांमध्येही दरोड्याच्या घटनेची चर्चा सुरु होती.

Web Title: Security at the ATM, bank's night security Ram Bharose, Dombivli bank management complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.