महापालिकेचा संकुलातील रस्ता सोसायट्यांनी केला बंद

By Admin | Published: February 7, 2017 03:45 AM2017-02-07T03:45:11+5:302017-02-07T03:45:11+5:30

उपमहापौरांच्या संकुलातील गेली पंधरा वर्षे वहिवाटीचा रस्ता, तोही महापालिकेला हस्तांतरीत केला असताना शेजारील काही सोसायट्यांनी अचानक बंद केला असून

The road projects of municipal corporation are closed | महापालिकेचा संकुलातील रस्ता सोसायट्यांनी केला बंद

महापालिकेचा संकुलातील रस्ता सोसायट्यांनी केला बंद

googlenewsNext

वसई : उपमहापौरांच्या संकुलातील गेली पंधरा वर्षे वहिवाटीचा रस्ता, तोही महापालिकेला हस्तांतरीत केला असताना शेजारील काही सोसायट्यांनी अचानक बंद केला असून, हा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी येथील महिला १२ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत.
नालासोपारा पश्चिमेला चाणक्यनगरी संकुल आहे. या संकुलातील उज्जयनी ही इमारत उपमहापौर उमेश नाईक आणि त्यांचे सहकारी माजी नगरसेवक प्रवीण विरा यांनी उभारली आहे.
या इमारतीकडे जाण्यासाठी शेजारच्या कनोज आणि बोधगया सोसायटीच्यामधील मोकळ्या जागेतून रस्ता देण्यात आला होता. येथील फ्लॅट विक्री करतांना विकासक उमेश नाईक आणि प्रवीण विरा यांनी हाच मार्ग ग्राहकांना दाखवला होता. तेंव्हापासून गेली बारा-पंधरा वर्षे याच मार्गाचा रहिवाशांसह सर्व वापर करीत होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक कोणतीही पूर्व सूचना न देता कनोज आणि बोधगया सोसायटीने या मार्गावर लोखंडी गेट उभारून त्याला टाळे ठोकले आहे. त्याच्या किल्ल्या या दोन सोसायटीतील सर्व रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उज्जयनी सोसायटीतील रहिवाशांना वाहनांनी जाण्यासाठी दूरच्या डांगे कॉम्पलेक्स कडून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करून मुख्य रस्त्यावर यावे लागते आहे. त्यामुळे रुग्ण,
विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांची मोठ्याप्रमाणात परवड होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The road projects of municipal corporation are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.