रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 03:44 AM2019-01-09T03:44:57+5:302019-01-09T03:45:08+5:30

यंत्रणांचे दुर्लक्ष : सॅटीसची चौकी हलवल्याने फावले

Rickshaw driver's molestation again increased | रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा वाढली

रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा वाढली

googlenewsNext

ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशनच्या सॅटीसखाली काही रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली आहे. रस्ते अडविणे, प्रवाशांबरोबर हुज्जत घालणे अशा प्रकारची अरेरावी रात्रीच्या वेळी सुरूअसते. या रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक विभाग तात्पुरती कारवाई करतो. परंतु, त्यांचीपाठ फिरताच ते पुन्हा सॅटीस परिसराचा ताबा घेतात. त्यातही येथील पोलीस चौकी हलविल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. रस्ता मोकळा करून पादचाऱ्यांना चालता यावे, यासाठी पालिकेने ती हटविली होती. परंतु,आता त्याचा गैरफायदा बेलगाम रिक्षाचालकांनी घेतला आहे.

रेल्वे स्थानकातील रिक्षाथांबा हा इतर ठिकाणांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी खास लेन केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही काही रिक्षाचालकांकडून सुरुवातीच्या दोन रांगा अडवून ठेवल्या जातात. त्यांना या लेनमध्ये जागा अडवून लांबचे आणि त्यातही शहराबाहेरचे भाडे हवे असते. त्यांच्या बेशिस्त रांगेत ते इतर रिक्षाचालकांना घुसू देत नाहीत. या ठिकाणी कारवाईसाठी आलेल्या वाहतूक पोलिसांबरोबर युनियनच्या नावाखाली ते हुज्जतही घालतात.

बेशिस्त रिक्षाचालकांची दादागिरी

नियमित रिक्षाथांब्याच्या जागेबरोबरच सॅटीसखालील सर्वच ठिकाणी रांगेची शिस्त न पाळणाºया रिक्षाचालकांची संख्या वाढली आहे. शेअररिक्षाच्या नावाखाली त्यांनी या परिसराचा ताबा घेतला आहे. याचबरोबर आलोक हॉटेलसमोरील रस्ता तर वागळे इस्टेट परिसरात शेअररिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांनी अनिधकृतपणे सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत ताब्यात घेतलेला असतो.

रिक्षांच्या रांगाच रांगा येथे लागतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी, त्यातही सकाळी आणि सायंकाळी या परिसरात वाहतूककोंडी होते. ते तीन प्रवासी मिळाल्यानंतर चौथ्या प्रवाशाची वाट पाहत जागा अडवतात. त्यामुळे अधिकृत थांबे दिल्यानंतरही त्यांनी रस्तेच ताब्यात घेतल्याने सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत पादचाºयांना येथून चालणे शक्य होत नाही.

वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई झाल्यानंतर या मोजक्या रिक्षाचालकांचा हैदोस या परिसरात सुरू झाल्याने याप्रकरणी नक्की दाद कोठे मागायची असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

शेअररिक्षांसाठी अधिकृत थांबे दिल्यानंतरही काही मोजक्या रिक्षाचालकांमुळे पादचाºयांना येथून चालणेदेखील शक्य होत नाही. पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने या मोजक्या रिक्षाचालकांचे फावले आहे. कोणत्याही युनियनचा नेता बेशिस्त रिक्षाचालकांची बाजू कधीच घेणार नाही. या रिक्षाचालकांवर एकाच वेळी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई झाली पाहिजे.
- संजय वाघुले, अध्यक्ष, भारतीय जनता रिक्षाचालक संघटना
 

Web Title: Rickshaw driver's molestation again increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे