३६३ व्या अभिनय कट्टयावर सुधाताई करमरकरांना आदरांजली, बालनाट्याचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:11 PM2018-02-12T17:11:00+5:302018-02-12T17:13:10+5:30

 ११ फेब्रुवारी २०१८ रोजी अभिनय कट्ट्याच्या ३६३ क्रमांकाचा कट्टा हा बालरंगभूमीच्या प्रणेत्या सुधाताई करमरकर यांना समर्पित करण्यात आला.

Respect for Sudhartai Karmarkar on 363th acting Kattarar, Presentation of Badlat | ३६३ व्या अभिनय कट्टयावर सुधाताई करमरकरांना आदरांजली, बालनाट्याचे सादरीकरण

३६३ व्या अभिनय कट्टयावर सुधाताई करमरकरांना आदरांजली, बालनाट्याचे सादरीकरण

Next
ठळक मुद्देकार्यक्रमात कट्ट्याच्या बालकलाकारांनी वाचाल तर वाचाल हे बालनाट्य सादर केले. बालकलाकरांच्या हस्ते दीपप्रज्वलन मोठ्या गटातील कलाकारांनी एकपात्री अभिनय सादर

ठाणे : सुधाताई करमरकर यांनी बालरंगभूमीच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे हे कार्य आताच्या बालकलाकारांना आणि सुजाण प्रेक्षकांना कळावे ह्या हेतू त्यांना अदारांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन अभिनय कट्टयावर करण्यात आले होते. सदर  कार्यक्रमात कट्ट्याच्या बालकलाकारांनी वाचाल तर वाचाल हे बालनाट्य सादर केले.

              प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाल्या नंतर बालकलाकरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  कट्ट्याच्या सुरवातीला मोठ्या गटातील कलाकारांनी एकपात्री अभिनय सादर केला. या वेळी विशेष  एकपात्री सदराचेआयोजन करण्यात आले हिते ज्या मध्ये तब्बल २० विविध विषयांवरच्या  एकपात्री सादर झाल्या. या मध्ये स्वप्नजा जाधव यांनी चौथी सीट, रुचिता आठवले हिने मी भूतकाळात हरवते, साक्षी महाडिक हिने गृहपाठ,नूतन लंके हिने वंशाची पणती ह्या एकपात्री सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.  रसिकांच्या टाळ्या लुटण्यासाठी पुढे रोहिणी थोरात हिने केलेली भांडकुदळ,हर्षदा शिंपीची लेडी रिक्षावाली, रुक्मिणी कदम यांची वैतागलेली पारू, अजित भोसले यांनी रंगवलेला मामु भटजी या एकपात्री सुद्धा सज्ज होत्या. या सर्वांसोबतच पतंग, बळीराजाचे समीकरण,भाजीवाली,अभ्यास या नाट्यछटा अनुक्रमे

रोहित मुणगेकर, लवेश दळवी,प्रतिभा घाडगे,रोशनी उंबरसाडे यांनी पेश केल्या. विजया साळुंखेने खेड्यातलं जीवन, शनी जाधवने ती च्या मनातल,शुभांगी भालेकरयांनी आजी बाईचा बटवा, आयुष हांडे याने पेपर वाल्या पोऱ्या या एकपात्री द्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.एकपात्री सदरच्या अंती सचिन हिनुकले याने सलीम पंचारवाला, अनिकेत शिंदेने हिरो नं १., तर कुंदन भोसले याने घर रंगवतो या एकपात्री द्वारे पहिल्या सदराची सांगता केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सदरामध्ये स्वप्नील काळे लिखित व दिग्दर्शित वाचाल नंतर वाचाल या बालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी एका अनोख्या सादरीकरणाच्या माध्यमातून सुधाताईंनी प्रवास रसिकांसमोर उलगडण्यात आला. आणि थेट बालनाट्याला सुरुवात झाली. वाचाल तर वाचाल लहानपणापासून आपण ऐकत आलोय कि, वाचाल तर वाचाल..अगदी वर्गातल्या फळ्यावर लिहिण्यासाठी कुठला सुविचार नसला तर पटकन लिहिल जात कि वाचाल तर वाचाल..इतकि हि “प्रचलित” ओळ. पण जितकी हि ओळ प्रचलित आहे तितकीच दुर्लक्षित आणि वंचित. वाचाल तर वाचाल ह्या बालनाट्याच्या माध्यमातून अनेक लहान मुलांना वाचन, शिक्षणाचे खरे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या पदरी लहानपणा पासून आलेल्या ऐश्वर्या मुळे वाचनाला शिक्षणाला कंटाळलेल्या श्लोक (श्रेयस साळुंखे) च्या मनात वाचन शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे असेल किंवा परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ ना शकलेल्या गण्या (अखिलेश जाधव) ची अवस्था  आणि त्याची शिक्षणाविषयीची तळमळ असेल. विनोदी पद्धतीने मांडलेल्या प्रबोधनात्मक बालनाट्यात अद्वैत मापगावकर, सई कदम, निमिष पिंपरकर, आर्य माळवी , प्रथम नाईक या सोबतच आदित्य, चिन्मय, निमिष,वैष्णवी, पूर्वा, सानवी, प्रांजल, हरित, वेदांत या बालकलाकारांचा समावेश होता.सदर कट्ट्याचे निवेदन संकेत देशपांडे यांनी केले होते.

Web Title: Respect for Sudhartai Karmarkar on 363th acting Kattarar, Presentation of Badlat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.