पुन्हा वेध डायघर प्रकल्पाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:44 AM2018-01-20T01:44:29+5:302018-01-20T01:44:32+5:30

कच-याच्या विल्हेवाटीवरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले असतांना आता महापालिकेने डायघर येथील

Repeated Diagram Project | पुन्हा वेध डायघर प्रकल्पाचे

पुन्हा वेध डायघर प्रकल्पाचे

Next

ठाणे : कच-याच्या विल्हेवाटीवरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले असतांना आता महापालिकेने डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या दिशेने पुन्हा एकदा पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या नागरिकांच्या विरोधामुळे गेली १२ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. याठिकाणी वृक्ष लागवड सुरु असून लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु होईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे शहरात आजच्या घडीला सुमारे ७५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. पालिका स्थापन झाल्यापासून, डम्पींगचा प्रश्न सुटलेला नाही. सुमारे १२ वर्षांपूर्वी डायघर येथे पालिकेने शास्त्रोक्त पध्दतीने कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु स्थानिकांचा विरोध झाल्याने पालिकेला हा प्रकल्प अर्ध्यावरच गुंडाळावा लागला. त्यानंतर कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मग कधी गायमुख, कधी खर्डी, कधी वागळे इस्टेट असा प्रवास करीत सध्या दिवा भागात कचरा टाकला जात आहे. शीळफाटा येथील वन विभागाची जागाही पालिकेच्या ताब्यात येत असून या जागेवर कचरा टाकण्यास वनविभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
या ठिकाणी १०० मेट्रीक टन कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. परंतु या सर्वांवर तोडगा निघावा म्हणून पालिकेने तळोजा येथील सामूहिक भराव भूमीमध्येही सहभाग घेण्याचे निश्चित केले होते. परंतु, एमएमआरडीएकडून आलेले दर आणि पालिकेने दिलेले दर यावरुन पालिकेने या प्रकल्पातून माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा शहरात कचºयाचा प्रश्न डोके वर काढू लागल्याने पालिकेने पुन्हा या योजनेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु आता ही योजनात बारगळल्याने कचरा कुठे टाकायचा, असा पेच पालिकेसमोर उभा राहिला आहे.
दरम्यान सध्या पालिकेकमार्फत शहरात निर्माण होणाºया विविध प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण करुन प्लास्टीक वेस्ट, वुड वेस्ट, डेब्रीज वेस्ट आदींसह इतर छोटेखानी प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. तसेच, १०० मेट्रीक टन कचºयावर काही सोसायटींच्या माध्यमातून प्रक्रिया सुरु झाली आहे.

Web Title: Repeated Diagram Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.