खंडणी प्रकरण : व्यापाऱ्याला ओलीस ठेवणारा पोलीस शिपाई दीपक वैरागड निलंबित

By जितेंद्र कालेकर | Published: July 13, 2018 10:52 PM2018-07-13T22:52:17+5:302018-07-13T22:57:07+5:30

The ransom case: Police Constable Dipak Vairagarh suspended | खंडणी प्रकरण : व्यापाऱ्याला ओलीस ठेवणारा पोलीस शिपाई दीपक वैरागड निलंबित

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके

googlenewsNext
ठळक मुद्देरिक्षाचालक आणि ‘त्या’ तरुणीचा शोध सुरूचदोन लाख दहा हजारांपैकी ६० हजारांचाही पत्ता लागेनाआरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके

ठाणे : नंदुरबारच्या व्यापा-याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी उकळणा-या दीपक वैरागड या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी गुरुवारी निलंबित केले आहे. या प्रकरणातील रिक्षाचालक आणि त्या मुलीचा शोध अजूनही सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अक्कलकुव्याचा व्यापारी रिजवान मेमन (२२) आणि त्याचा मित्र एजाज नुरू (२३) या दोघांना खंडणीसाठी ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकरण सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता वैरागडला निलंबित केले आहे. रिजवानकडून खंडणी उकळण्यासाठी त्याला ‘सेक्स’च्या जाळ्यात अडकवणारी सोहेल पंजाबीची मैत्रीण आणि तिचा साथीदार रिक्षाचालक यांचा तिसºया दिवशीही शोध लागला नाही. त्यांना शोधण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार केली आहेत. याशिवाय, रिजवान याच्याकडून दीपक आणि सोहेल यांनी दोन लाख १० हजारांची रोकड वाशी येथून घेतली. त्यानंतर ते कारने ठाण्याच्या वर्तकनगर भागात गेले. वर्तकनगर येथून माजिवडा येथे येत असतानाच त्यांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून दीड लाखांची रोकडही जप्त केली. परंतु, उर्वरित ६० हजारांच्या रकमेचा काहीच शोध लागलेला नाही. शिवाय, दीपक आणि सोहेल यांनी ते कोणाला दिले, याबाबत त्यांनी अजूनही तपास पथकाला माहिती दिली नाही. त्यामुळे या उर्वरित रकमेबाबतही संभ्रम अधिक वाढला आहे. शिवाय, येऊरच्या बंगल्यावर दीपकसोबत धाडीसाठी पोलीस असल्याची बतावणी करून आलेले त्याचे दोन साथीदार कोण होते? त्यांचाही शोध लागलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The ransom case: Police Constable Dipak Vairagarh suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.