लाचखोर निलंबित उपशक्षिकास शिक्षण विभागाच्या उपक्रमात व्यासपीठावर बसवण्याचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 08:21 PM2018-04-09T20:21:15+5:302018-04-09T20:21:15+5:30

पालिकेच्याच एका शिक्षिके कडुन वाढिव वेतनश्रेणी देण्यासाठी लाच घेताना अटक झालेल्या उपशिक्षक अनिल आगळे याला सेवेत घेतले नसताना देखील

Privileges to set up bribery suspended sub-education on the platform in the education department's activities | लाचखोर निलंबित उपशक्षिकास शिक्षण विभागाच्या उपक्रमात व्यासपीठावर बसवण्याचा बहुमान

लाचखोर निलंबित उपशक्षिकास शिक्षण विभागाच्या उपक्रमात व्यासपीठावर बसवण्याचा बहुमान

Next

मीरारोड - पालिकेच्याच एका शिक्षिके कडुन वाढिव वेतनश्रेणी देण्यासाठी लाच घेताना अटक झालेल्या उपशिक्षक अनिल आगळे याला सेवेत घेतले नसताना देखील ते शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमां मध्ये व्यासपीठावर चक्क अधिकारयां सोबत मांडीला मांडी लाऊन बसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचखोरास सन्मानाचे स्थान दिले जात असल्याचे पाहुन शिक्षक वर्गात देखील खळबळ उडाली आहे.

जुलै २०१७ मध्ये उपशिक्षक अनिल आगळे याला मीरा भार्इंदर महापालिकेच्या उर्दु शाळेच्या शिक्षिका फरीदा कुरेशी यांच्या कडुन ५ हजार रुपयांची लाच घेताना पालिका शाळेतच रंगेहाथ अटक करण्यात आले होते.
कुरेशी यांची सेवेची १२ वर्ष पुर्ण झाल्या बद्दल त्या गेल्या काही वर्षां पासुन सातत्याने वाढिव वेतनश्रेणी मिळावी म्हणुन शिक्षण विभागा कडे मागणी करत होत्या.

त्यावेळी मीरा गावातील पालिका शाळेत उपशिक्षक असलेल्या अनिल आगळे याने कुरेशी यांच्याशी संपर्क साधुन तुम्हाला वाढिव वेतनश्रेणी हवी असेल तर वरिष्ठांना ५ हजार रुपये द्यावे लागतील अशी पैशांची मागणी केली होती. कुरेशी यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केल्या नंतर आगळे याला पैसे घेताना रंगेहाथ अटक झाली होती.

आगळे उपशिक्षक असुनही शिक्षण विभागात ठाण मांडुन असत. प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांच्या सोबत ते सतत वावरत होते. आगळे याला पकडल्या नंतर अशाच प्रकारे अन्य शिक्षकां कडुन देखील पैसे उकळले गेल्याची शिवाय मुख्याध्यापकांची पदोन्नती, बदल्या आदिं मध्ये सुध्दा गैरप्रकार झाल्याची
चर्चा सुरु झाली.

वाढिव वेतनश्रेणी मंजुर करण्यासाठी थेट शिक्षण विभागाचे उपसंचालक, विस्तार अधिकारी, ठाणे जिल्हा शिक्षण अीधकारी तसेच कार्यालयातील लिपीक व पालिका शिक्षण अधिकारयास पैसे द्यावे लागतात असे आगळे ने कुरेशी यांना सांगीतले होते.

लाच घेताना पकडले गेल्या पासुन आगळे याला निलंबित करण्यात आले आहे. अजुनही पालिका सेवेत घेतलेले नाही. तसे असताना देखील आगळे शिक्षण विभागा कडुन राबवल्या जाणारया विविध उपक्रमांना हजेरी लावत आहेच. पण व्यासपीठावर चक्क मान्यवर म्हणुन शिक्षणाधिकारी बाबर व प्रशासन अधिकारी देशमुख यांच्या सोबत जाहिरपणे बसत असल्याचे पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

तर या प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी मात्र, आगळे यांना लाच प्रकरणी अटक झाली होती व ते निलंबित असल्याची माहिती मला प्रशासन अधिकारी वा अन्य कोणी दिली नव्हती असे सांगीतले. परंतु मला ही बाब कळल्या पासुन आगळे यांना मनाई करण्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले .

Web Title: Privileges to set up bribery suspended sub-education on the platform in the education department's activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.