अभिनय कट्ट्यावर ‘झेंडा हरवला आहे’चे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:30 AM2019-01-31T00:30:22+5:302019-01-31T00:30:27+5:30

सांस्कृतिक कार्यक्रमात बालकांचाही सहभाग

Presentation of 'Flag is missing' on acting art | अभिनय कट्ट्यावर ‘झेंडा हरवला आहे’चे सादरीकरण

अभिनय कट्ट्यावर ‘झेंडा हरवला आहे’चे सादरीकरण

googlenewsNext

ठाणे : देशात अनेक रंगांच्या झेंड्यांमध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे, त्याचा शोध घेऊन कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणे लागतो, अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतींतून समाजप्रबोधन करण्यात आले. त्यापैकी प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी ‘झेंडा हरवला आहे’ ही एकांकिका सादर करून देशभक्तीचे प्रबोधन केले.

कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांच्या संकल्पनेतून परेश दळवी लिखित, आदित्य नाकती दिग्दर्शित ही एकांकिका सादर करण्यात आली. देशातील अनेक झेंड्यांमागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे ‘झेंडा हरवला आहे’. फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशासाठी त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावा, हा संदेश यावेळी दिला. ही एकांकिका सहदेव साळकर, ओमकार मराठे, महेश झिरपे, अमोघ डाके या कलाकारांनी सादर केली.

यासोबत, कट्ट्याच्या कलाकारांनी कदीर शेख दिग्दर्शित ‘ये मेरे वतन के लोगो’ आणि ‘ये वतन वतन’ या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. या सादरीकरणात आदित्य नाकती, परेश दळवी, राजन मयेकर, शिन जाधव, धनेश चव्हाण, वैभव पवार, आतिश जगताप, संज्योत बावीसकर, उत्तम ठाकूर, शुभम कदम, कुंदन भोसले, रोहित सुतार, महेश झिरपे, सहदेव कोळंबकर, वैभव चव्हाण, न्यूतन लंके, विजया साळुंके आणि रोहिणी थोरात या कलाकारांनी सहभाग घेतला. तसेच, परेश दळवी दिग्दर्शित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ याचे सादरीकरण कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले.

या सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये, अमोघ डाके, अर्णय वाघ, अद्वैत मापगावकर, अस्मी शिंदे, पूर्वा तटकरे, वैष्णवी चेऊलकर, प्रथम नाईक, रु चिता भालेराव या बालकलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे निवेदन राजन मयेकर यांनी केले.

Web Title: Presentation of 'Flag is missing' on acting art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.