डोंबिवलीच्या प्रदूषणाचा बाप्पालाही फटका, 'राजा'ची मूर्ती पडली काळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 11:05 AM2018-09-19T11:05:42+5:302018-09-19T11:44:02+5:30

डोंबिवलीच्या प्रदूषणाने आत्ता नागरीक सोडा चक्क बाप्पालाही सोडले नाही.

pollution in dombivli affect ganpati idol | डोंबिवलीच्या प्रदूषणाचा बाप्पालाही फटका, 'राजा'ची मूर्ती पडली काळी

डोंबिवलीच्या प्रदूषणाचा बाप्पालाही फटका, 'राजा'ची मूर्ती पडली काळी

googlenewsNext

डोंबिवली - डोंबिवलीतील रासायनिक कंपन्यातून होत असलेल्या वायू व जल प्रदूषणामुळे नागरीक हैराण व बेजार झालेले असताना ही समस्या अद्याप सुटलेली नाही. डोंबिवलीच्या प्रदूषणाने आत्ता नागरीक सोडा चक्क बाप्पालाही सोडले नाही. दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसापासून काळी पडत आहे. मूर्तीकार रंग देऊन पाहतो. मात्र पुन्हा 24 तासात मूर्तीचा रंग काळा पडतो. या प्रकारामुळे प्रथम मूर्तीची स्थापना करणारे मंडळ चक्रावून गेले आहे.

दावडी गावातील तुकाराम चौकानजीक ओम साई मित्र मंडळातर्फे दावडीच्या राजाची स्थापना केली जाते. हे मंडळ 11 वर्षापासून गणोशोत्सव साजरा करत आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी सांगितले की, त्यांनी दावडीच्या राजाची मोठी मूर्ती व त्याच्या समोर पूजनासाठी असलेली लहान मूर्ती दहा सप्टेंबरला आणली. दोन दिवस सजावटीमुळे तिच्यावरील प्लास्टीक काढलेले नव्हेत. मूर्ती 13 सप्टेंबर रोजी मंडपात विधीवत पूजेसह स्थापन केली. पहिल्या दिवसापासून मूर्ती काळसर होत गेली. मूर्ती काळी पडण्याचे प्रमाण पाचव्या दिवशी जास्त होते. घेसर येथील संतोष पानेरकर यांच्याकडून ही मूर्ती आणल्याने त्यांना पाचारण केले. त्यांच्याकडून मूर्तीला पुन्हा रंग मारला. मात्र अवघ्या चोवीस तासाच्या आतच सहाव्या दिवशी पून्हा मूर्ती काळी पडली. तसेच मूर्तीच्या समोर पूजेची लहान मूर्ती ही त्यापेक्षा जास्त प्रमाणात काळी पडली. प्रदूषणाच्या दुष्परिणामामुळे मूर्ती काळी पडल्याचे सांगण्यात आले आहे. 


 

Web Title: pollution in dombivli affect ganpati idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.