‘चव्हाण टॉवर’मधील ‘त्या’ कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पूर्ववत,  पोलीस उपायुक्तांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 09:53 PM2017-10-01T21:53:44+5:302017-10-01T21:53:51+5:30

मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या कथित पदाधिका-यांनी चक्क दोन कुटुंबीयांच्या सदनिकांची पाणी जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार एक आठवडयापूर्वी घडला होता.

Police Deputy Commissioner intervened to restore water supply to 'those' families in Chavan Tower | ‘चव्हाण टॉवर’मधील ‘त्या’ कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पूर्ववत,  पोलीस उपायुक्तांनी घेतली दखल

‘चव्हाण टॉवर’मधील ‘त्या’ कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पूर्ववत,  पोलीस उपायुक्तांनी घेतली दखल

Next

जितेंद्र कालेकर
ठाणे : मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या कथित पदाधिका-यांनी चक्क दोन कुटुंबीयांच्या सदनिकांची पाणी जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार एक आठवडयापूर्वी घडला होता. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या आदेशानंतर वर्तकनगर पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाºयांनी हा पाणीपुरवठा अखेर पूर्ववत केला आहे.
चव्हाण को आॅप. सोसायटीमधील नितीन चव्हाण यांच्याकडे चार महिन्यांतील मेन्टनन्स (देखभाल) पोटी दंडासह साडे सात हजारांची थकबाकी आहे. यासाठी सोसायटीच्या पदाधिकाºयांनी थेट पाणी जोडणीच तोडू, अशी धमकी दिली होती. सोसायटीनेही दुरुस्ती आणि पाईप लिकेजची कामे करावीत, असे पत्र चव्हाण यांनी सोसायटीला दिले. या पत्राला न जुमानता सोसायटीने थकबाकी न भरल्यास पाणीजोडणी तोडण्याच्या धमकीचे पत्र ९ जुलैला दिले. तेव्हापासून हा वाद सुरु होता. ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर रोजी काही रहिवाशांनी बेकायदेशीरपणे चव्हाण यांच्या ४०१ आणि ७०४ या दोन सदनिकांची पाणी जोडणीच तोडली. त्याची चव्हाण यांनी वर्तकनगर पोलिसांसह मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनीच पाणी तोडण्यास सांगितल्याचा दावा करीत सोसायटीच्या काही महिला पदाधिकाºयांनी पाणी पुरवठा पूर्ववत करण्यास असमर्थता दर्शविली. 
याबाबतचे सविस्तर वृत्त, ‘लोकमत’च्या २८ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याचीच दखल घेत वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी चव्हाण कुटुंबीयांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा तसेच संबंधितांवर कारवाईचे आदेश वर्तकनगर पोलिसांना दिले होते. 
................................. 
भाडेकरूने सोडली रुम
सोसायटीच्या हेकेखोर पदाधिकाºयांनी चव्हाण यांच्या भाडेकरूची पाणी जोडणी तोडली. ती सहा दिवसांनंतरही पूर्ववत केली नाही. अखेर या भाडेकरूने रविवारी ही सदनिका रिक्त केली.
........................
अखेर पाणीपुरवठा पूर्ववत
या इमारतीचा प्लंबर सागर हरड याची याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चौकशी केली. त्यानेही सोसायटीच्या सांगण्यानुसार पाणी तोडल्याची कबुली दिली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांनी १ आॅक्टोंबर रोजी त्याने या दोन्ही सदनिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत केला. लोकमतने पाठपुरावा केल्याबद्दल चव्हाण यांनी आभार मानले आहे.
......................... 
पाणीखंडीत करणे बेकायदेशीरच
एखाद्या थकबाकीसाठी पाण्यासारखी अत्यावश्यक सेवा खंडीत करणे हे बेकायदेशीर आहे. तरीही याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यात कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करायचा, याबाबत विधी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
...........................
अध्यक्षांची परवानगीच नव्हती
सोसायटीच्या अध्यक्षा शोभा गुजर यांची परवानगी न घेता परस्पर काही ठराविक पदाधिकाºयांनीच ही कारवाई केली. परस्पर एखाद्याचे पाणी तोडणाºयांवर कारवाई करण्याची मागणी गुजर यांनीही वर्तकनगर पोलिसांकडे केली आहे.

 

Web Title: Police Deputy Commissioner intervened to restore water supply to 'those' families in Chavan Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.