उल्हासनगरमध्ये एक पिस्तूल, दोन गावठी कट्टयांसह एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 03:14 PM2019-03-29T15:14:13+5:302019-03-29T15:21:18+5:30

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुरुवारी (29 मार्च) अटक केली आहे. तरुणाकडून एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत.

police arrest one in ulhasnagar | उल्हासनगरमध्ये एक पिस्तूल, दोन गावठी कट्टयांसह एकाला अटक

उल्हासनगरमध्ये एक पिस्तूल, दोन गावठी कट्टयांसह एकाला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देशहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुरुवारी (29 मार्च) अटक केली आहे. तरुणाकडून एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. न्यायालयाने तरुणाला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुरुवारी (29 मार्च) अटक केली आहे. तरुणाकडून एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने तरुणाला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली असून एका आठवड्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन पिस्तूल व दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत . ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहाड रेल्वे उड्डाण पूल परिसरात एक जण शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तरडे यांनी उड्डाण पूल परिसरात पोलीस पथक स्थापन करून सापळा लावला. गुरुवारी (28 मार्च) दुपारी अद्दीच वाजता एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. या संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.   गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल-26 असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. 

उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. गोविंद सिंग भदोरिया मूळचा मध्यप्रदेश मधील राहणारा आहे. मात्र सध्या तो शहरातील शांतीनगर परिसरात राहत होता. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी व्हिटीसी मैदान परीसरात मध्यरात्री अडीच वाजता मोटारसायकलवरून फिरणाऱ्याची दोघांची अंगझडती घेतली होती.  त्यांच्याकडे एक पिस्तूल मिळाली आहे. पोलिसांनी एकाच आठवड्यात तीन जणांना चार शस्त्रांसह अटक केली आहे. याप्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी काही घातपाताची तर शक्यता नव्हती, यामार्गाने तपास केला जात असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. 

 

Web Title: police arrest one in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.