The owl was hit by the manga in the math | पतंगाच्या मांजात गवई घुबड झाले जखमी
पतंगाच्या मांजात गवई घुबड झाले जखमी

डोंबिवली - शहराच्या पश्चिम भागातील भागशाळा मैदानात पतंगाच्या मांजात गवई घुबड जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हे घुबड जखमी झाल्याचे कळताच प्लांट अ‍ॅण्ड अनिमल वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेने घाव घेऊन घुबडावर उपचार केले आहे.
सोसायटीच्या हेल्पलाईनला फोन आला. तेव्हा सोसायटीने भागशाळा मैदानात धाव घेतली. गवई घुबड या जातीच्या घुबडाच्या गळयाला मांजा फसला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. या जातीचे घुबड हे शहरी भागात आढळून येते. त्याच्यावर उपचार करुन त्याला आज रात्री सोडून देण्यात येणार आहे अशी माहिती सोसायटीचे प्रमुख निलेश भगणे यांनी दिली आहे.

मकर संक्रात आली की पतंग उडविण्याचे प्रमाण वाढते. दोन दिवसापासून पतंग उडविण्यास सुरुवात झाली असून पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेला गवई घुबडाची केस पहिली आहे. मकर संक्रातीच्या दिवशी अनेक ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केले जातात. त्यावेळी किती पक्षी जखमी होतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी. पक्षी जखमी होण्याचे प्रमाण असेल तरी सोसायटीच्या हेल्पलाईनला फोन केल्यावर सोसायटीचे कार्यकर्ते त्याठिकाणी तातडीने पोहतील अशी माहिती भगणे यांनी दिली आहे.

कल्याणमध्ये गणेश घाट खाडी परिसरात मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात महोत्सवाचे पदाधिकारी चंद्रकांत गधर यांच्याकडे विचारणा केली असता महोत्सवाचे आयोजन केले असले तरी पक्षांना इजा होणार नाही यासाठी काय उपाययोजना केली आहे. याविषयी काही एक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

कल्याण खाडी परिसरात पक्षांचा वापर जास्त आहे. या पतंग महोत्सवामुळे पक्षी जास्त प्रमाणात गंभीर होऊ शकतात. याकडे सोसायटीने लक्ष वेधले आहे. पंतगासाठी मांजा वापरण्यावर बंदी असताना सर्रासपणे मांजाचा वापर केला जातो. त्यामुळे पक्षी जखमी होतात. प्रसंगी त्यांचा मृत्यू होतो. ठाण्यात डिसेंबर महिन्यात पक्षी मित्र संमेलन पार पडले. यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला होता.
फोटो आहे.

 

 


Web Title: The owl was hit by the manga in the math
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.