वसुंधरा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली हेरीटेज ट्रीची माहिती

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 22, 2024 05:30 PM2024-04-22T17:30:02+5:302024-04-22T17:31:34+5:30

पर्यावरण दक्षता मंडळाने सोमवारी वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.

on the occasion of world environment day students took information about heritage tree in thane | वसुंधरा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली हेरीटेज ट्रीची माहिती

वसुंधरा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली हेरीटेज ट्रीची माहिती

प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळाने सोमवारी वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांना आनंद विश्व गुरुकुल जवळच असणाऱ्या मित्तल पार्क आणि प्रकृती सोसायटीच्या आवारात असणाऱ्या हेरीटेज ट्री बाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या परिसरात जांभूळ, आंबा, पुत्रंजिवा, कैलासपती, वड, निलगिरी यांसारख्या हेरिटेज वनस्पती आहेत. तसेच आसाणा, आपटा, काटेसावर, पारिजातक, आंबा अश्या अनेक वनस्पतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तेथील आमराईत आंब्याची अनेक झाडे आहेत. आंब्याचे महत्व सांगण्यात आले. आमराईच्या परिसरातील अनेक झाडांच्या बिया खाली पडल्या होत्या. त्या बिया विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगितले. या बियांचे रोपंन कसे करावे याबाबत माहिती हरियाली संस्थेचे ओम प्रकाश यांनी दिली.

संस्थेतर्फे आनंद विश्व गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी "माझी वसुंधरा" हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रकृती सोसायटीच्या सभासद वीणा जोशी यांनी सोसायटीच्या आवारात असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाला विद्यार्थ्यांसोबत भेट दिली. आपल्या वसुंधरेला हरित ठेवायचे असेल तर सर्वाना कचरा व्यवस्थापन करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. आजच्या या वसुंधरा दिनाची थीम "प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक" ही आहे. या विषयी माहिती पौर्णिमा यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

वसुंधरेचे संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. “माझी वसुंधरा माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य सर्वांनी अंगीकारले पाहिजे. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे असेही पौर्णिमा शिरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मित्तल पार्कचे कार्यकारिणी सभासद करमरकर व उल्हास प्रधान, प्रकृती सोसायटीच्या पूनम शाह, आनंद विश्व गुरुकुल शाळेच्या स्मिता खराडे व संजय बाबर उपस्थित होते.

Web Title: on the occasion of world environment day students took information about heritage tree in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.