ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:45 AM2019-05-06T01:45:07+5:302019-05-06T01:45:17+5:30

राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत.

The number of accident casualties in Thane district has declined by 48, and measures are effective | ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

Next

- पंकज रोडेकर
ठाणे - राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत. जिल्हा प्रशासनाला ठाणे जिल्ह्यातील अपघातांसोबतच, त्यामधील बळींची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत ४८ ने कमी करण्यात यश आले. अपघातांमधील बळींची संख्या घटवण्यात ठाणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब असली तरी, दुसरीकडे ब्लॅक स्पॉट्सची अर्थात अपघातप्रवण स्थळांची संख्या दोनने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अपघातांची वाढती संख्या लक्षात घेत, सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी संबंधित यंत्रंणांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, मध्यंतरी संबंधित यंत्रणांची दर गुरूवारी नियमीत बैठक घेतली जात होती. लोकसभा निवडणुकीनंतर २ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुन्हा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून काही सूचना केल्या. यावेळी जिल्ह्यातील अपघातांची संख्या घटली असून, बळींची संख्याही ४८ ने कमी घटल्याची आकडेवारी मांडण्यात आली. वाहतुकीसंदर्भात आरटीओ, ठाणे शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलिसांनाही महामार्गांवर सद्यस्थितीत कुठे दुभाजक तोडले आहेत का? तसेच दुभाजक झिजल्याने रस्त्याच्या समांतर आले आहेत का? याबाबत पाहणी करून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे-नवी मुंबईत नवे ब्लॅक स्पॉट्स
जिल्ह्णात १०७ ब्लॅक स्पॉट्स होते. त्यामध्ये दोनने वाढ झाल्याने ही संख्या १०९ झाली आहे. हे स्पॉट्स ठाणे शहरातील गायमुख आणि नवीमुंबईतील घनसोली पुलाजवळ असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खर्डीजवळ लवकरच
ट्रामा सेंटर?
नाशिक महामार्गावर होणाºया अपघातांमधील अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी या बैठकीत खर्डीजवळ ट्रामा सेंटर उभारावे आणि त्यासाठी लागणाºया जागेची पाहणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.

राज्यात ठाणे एक नंबरवर

अपघातातील बळींची संख्या जानेवारी ते मार्च २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये ४८ ने कमी झाली आहे. एवढ्या प्रमाणात ही संख्या घटवणारा ठाणे जिल्हा राज्यात एक नंबरवर आहे. त्याखालोखाल पुणे ३२, मुंबई २४, औरंगाबाद २३, तर अमरावतीमध्ये बळींची संख्या १३ ने कमी झाली.

५० पत्रकारांचे
होणार शिबिर
अपघातांबाबत वृत्तसंकलन करणाºया ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील ५० पत्रकारांचे एक शिबिर लवकरच आयोजिण्यात यावे. यामध्ये त्यांना नेमका अपघात आणि त्याच्या जनजागृतीबाबत मुंबईच्या धर्तीवर धडे द्यावे, असे म्हटले आहे.

Web Title: The number of accident casualties in Thane district has declined by 48, and measures are effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.