आता ‘बांगलादेशी’ही करू लागले चोºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:36 AM2017-11-29T03:36:26+5:302017-11-29T03:36:36+5:30

पुणे शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र वाढल्याचे एरवी ऐकायला मिळतच असते; हे गुन्हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगार करतात हेसुद्धा नेहमी ऐकिवात येते.

 Now Bangladeshi also started doing chores | आता ‘बांगलादेशी’ही करू लागले चोºया

आता ‘बांगलादेशी’ही करू लागले चोºया

Next

पुणे : पुणे शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र वाढल्याचे एरवी ऐकायला मिळतच असते; हे गुन्हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगार करतात हेसुद्धा नेहमी ऐकिवात येते. मात्र, आता थेट ‘बांगलादेशी’ घुसखोर पुण्यामध्ये घरफोड्या करू लागल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सिंहगड रस्ता भागात झालेली एक घरफोडी उघडकीस आणली असून, त्या बांगलादेशी तरुणांना गजाआड करण्यात आले आहे.
इदानूर रहेमान राकिब (वय ६२), जाकीर कोबिद हुसेन (वय ४२, दोघेही रा. संतोषनगर, कात्रज, मूळ बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राकिब व हुसेन हे दोघेही बांगलादेशामधील ढाका जिल्ह्यातील सारोकिया हाजीपाडा येथील राहणारे आहेत. आरोपींकडून सिंहगड रस्ता आणि सहकारनगर येथील प्रत्येकी एक आणि बिबवेवाडीतील दोन, असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ९ लाख ७७ हजारांचे सोने व रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकिब हा व्हिसा न घेताच बेकायदेशीरपणे भारतात आलेला आहे. तर, हुसेन एक महिन्याच्या टुरिस्ट (पर्यटन) व्हिसावर भारतात आलेला आहे. मात्र, हुसेन परत मायदेशी न जाता येथेच बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होते.
सिंहगड रस्त्यावरच्या सन युनिव्हर्स या सोसायटीमध्ये २१ नोव्हेंबर रोजी फिर्यादी विद्या बोरा यांचा फ्लॅट फोडून आरोपींनी ३७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली होती. यासोबतच सुरक्षारक्षकाकडेही चौकशी करण्यात आलेली होती. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी अधिकाºयांसह घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचनाही दिलेल्या होत्या. हे आरोपी चोरी केल्यानंतर सहा आसनी रिक्षातून कात्रजला गेल्याचे सीसीटीव्हीवरून निष्पन्न झाले होते. पोलिसांनी कात्रज, संतोषनगर, आंबेगाव भागात वेगवेगळ्या पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू केला असता संतोषनगर भागात राहिब पोलीस कर्मचारी अनिरुद्ध सावर्डे यांना दिसून आला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी पथकासह जाऊन त्याला
ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हुसेनलाही अटक करण्यात आली. दोघांकडून घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

घरमालकही दोषी : करार केला नाही

बांगलादेशातून पुण्यात आल्यानंतर हे दोघेही चोरीचे गुन्हे करीत आहेत. त्यांना २०१५मध्ये चंदननगर पोलिसांनी अटक केली होती. त्याही वेळी त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले होते. या गुन्ह्यात जून २०१७मध्ये जामीन मिळाल्यानंतर त्यांना बांगलादेशात धाडण्यात आले होते. त्यानंतर १२ जून २०१७ रोजी आरोपी परत पुण्यातील कोंढवा परिसरात चोरी करताना पकडले गेले. अवघ्या नऊच दिवसांत ते परत पुण्यात आले. विविध गुन्ह्यांत पकडले गेल्यानंतर जामिनावर मुक्तता झाल्यावर त्यांनी घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. आरोपी हे भारतात आले कसे, याचा तपास करण्यात येत आहे. - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त

Web Title:  Now Bangladeshi also started doing chores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा