मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:29 AM2018-11-10T03:29:01+5:302018-11-10T03:29:03+5:30

मीरा - भार्इंदरमध्ये दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.

 The noise of crackers in Mira-Bharinder midnight also | मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज

मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज

googlenewsNext

मीरा रोड / भार्इंदर : दिवाळीत रात्री ८ ते १० दरम्यान फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळ तसेच राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  फटाके फोडू नका’, ‘प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा’, असे आवाहन केले असताना मीरा - भार्इंदरमध्ये मात्र, दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.
फटाक्यांमुळे आवाज तसेच फटाक्यांच्या धुराचा विविध प्रकारे होणारा त्रास पाहता बहुसंख्य नागरिकांमध्येही फटाके फोडण्यावरून
नाराजी आहे. रु ग्ण, लहान मुले, वृद्ध यांना तर फटाके जाचकच ठरले आहेत. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास अटीशर्तींनुसार मंजुरी दिली आहे. तर दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांसह शासनाने देखील फटाके फोडू नका असे आवाहन करत प्रदूषणमुक्त दिवाळीचे धोरण अवलंबले आहे.
मात्र, मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही महापालिकेने शासनाचे धोरण न राबवता शहरात रस्ते, पालिकेचे उद्यान, मैदान येथे सर्रास फटाके विक्रीच्या परवानग्या दिल्या आहेत. पालिकेने फटाके विक्र ी तसेच फोडण्यासाठी असे उघड प्रोत्साहन दिले असतानाच दुसरीकडे पोलिसांनीसुद्धा फटाके फोडण्यासाठी मोकळे रान दिले. मंगळवारपासून शहरात मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत सर्रास ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे फटाके फोडले जात आहेत. वास्तविक, रात्री १० वाजेपर्यंतच वेळ असताना बिनधास्त फटाके फोडताना दिसत आहेत. लोकांनी पोलिसांना तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा अनुभव भार्इंदर, काशिमीरा,
नया नगर पोलीस ठाण्यांकडून आला. भार्इंदर व नया नगर पोलीस ठाण्याचा तर नंतर फोनच घेतला जात नव्हता.
पोलीस महासंचालक व ठाणे ग्रामीणच्या कंट्रोल रूममध्ये तक्रारी करूनसुद्धा पोलिसांकडून कार्यवाहीच झाली नाही. त्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न सुनील भगत व अन्य नागरिकांना पडला आहे.

आम्ही फटाक्यांच्या पूर्णपणे
विरोधातच आहोत. कारण
आवाज व धुराचा ज्येष्ठ, रु ग्ण, लहान
मुलं यांना खूपच त्रास होतो. मुख्यमंत्री
यांनी फटाके न फोडण्याच्या केलेल्या
आवाहनानुसार शहरात भाजपासुद्धा
जनजागृती करेल. पोलीस आणि
पालिका प्रशासनाची जबाबदारी आहेच
पण त्याचबरोबर सुशिक्षित आणि
जागरूक नागरिकांनीसुद्धा फटाके
फोडणे टाळले पाहिजे. सर्वोच्च
न्यायालयाने दिलेल्या वेळेचे पालन
केले पाहिजे.
- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपा

सर्वोच्च न्यायालयाने
दिलेले आदेश आणि
मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन याचे
पालन सर्वांनीच केले पाहिजे. कारण
लोकांचे आरोग्य व पर्यावरण
संरक्षणासाठी हे गरजेचे आहे .
पोलीस आणि पालिकेची जबाबदारी
आहे. यात वाद किंवा मतभेद
असण्याचे कारण नाही. आज
दिल्लीची जी घातक स्थिती झाली
आहे त्याचा आपण आतापासूनच
गांभीर्याने विचार केला पाहिजे.
- सुरेश खंडेलवाल,
विधि व नियोजन समिती सभापती

मीरा-भार्इंदरमध्ये फटाके
विक्रे त्यांवर गुन्हा दाखल
करण्याची कार्यवाही सुरू आहे .
फटाके फोडण्याची ठिकाणे व्यापक
असली तरी पोलीस आलेल्या
तक्रारीनुसार घटनास्थळी गेले असता
फटाके वाजवणारे पळून जात वा
पोलिसांची गाडी लांबूनच पाहून ते
फटाके फोडणे बंद करत. पोलीस
ठाण्यांनी फोन का घेतले नाहीत
याची चौकशी सुरू आहे.
- युवराज कलकुटगे,
पोलीस उपनिरीक्षक व जनसंपर्क
अधिकारी, ठाणे ग्रामीण

Web Title:  The noise of crackers in Mira-Bharinder midnight also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.