शाळांचा वीजपुरवठा ग्रामपंचायतींच्या खांद्यावर!, डिजिटल स्कूलसाठी प्रशिक्षकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:28 AM2017-10-23T03:28:38+5:302017-10-23T03:28:40+5:30

ठाणे : चोखंदळपणाने आधुनिकेची वाट धरणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकामागून एक शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला.

The need for trainers for digital school is on the shoulders of the Gram Panchayats! | शाळांचा वीजपुरवठा ग्रामपंचायतींच्या खांद्यावर!, डिजिटल स्कूलसाठी प्रशिक्षकांची गरज

शाळांचा वीजपुरवठा ग्रामपंचायतींच्या खांद्यावर!, डिजिटल स्कूलसाठी प्रशिक्षकांची गरज

Next


ठाणे : चोखंदळपणाने आधुनिकेची वाट धरणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकामागून एक शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला. मात्र वीजबील रखडल्यामुळे बहुतांशी शाळांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी दिले. या वृत्ताची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अखेर गावातील शाळांच्या वीज पुरवठ्यासह वीज भरण्याची जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात प्रथमच ठाणे जि.प.च्या शाळा डिजिटल झाल्याची घोषणा राज्यपाल ठाणे जिल्हा दौºयात करणार होते. सुमारे ७७ शाळांचा वीज पुरवठा खंडीत असल्याचे वृत्त दरम्यान प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत आता गावातील शाळांच्या सुरळीत वीज पुरवठ्यासह वीज बिलाची रक्कम व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्यातील ४३० शाळांवर ठाणे जिल्हा परिषदेने सोपवली आहे. हा निर्णय नुकताच घेतल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.
वीज बीलाची रक्कम थकवल्यामुळे शाळांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने वेळोवेळी केली आहे. यामुळे सुमारे दोन-दोन वर्षे शाळेत लाइट, पंखे बंद व संगणक एलसीडी प्रोजेक्टरदेखील धूळ खात पडून होते. यास ठाणे जिल्हा परिषदेचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचा आरोप तत्कालीन आ. रामनाथ मोते यांनी केला आहे. यामुळे डिजिटल शाळांचे भवितव्य अल्पजीवी ठरण्याची भीती आहे.
>वीजबिलांच्या रकमेची तरतूदच नाही
कल्याण पं.स.च्या कार्यकक्षेतील वीज पुरवठा खंडीत केलेल्या ७७ शाळांचे १७ लाख ७२ हजार १४३ विजेचे बिल थकल्याने येथील वीजेचे मीटर काढून नेल्याने वीज पुरवठा खंडीत होता. यामुळे ९७ शाळांमधील संगणक धूळखात पडून होते.
शाळांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासह त्यांच्या वीज बिलांच्या रकमेसाठी तरतूद न करताच ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला आहे; पण आता वीज बील भरण्याची जबाबदारी ग्राम पंचायतींवर टाकली आहे. त्या विरोधातही काही शिक्षक बंड पुकारण्याच्या प्रयत्नात असून, प्रशिक्षक दिल्याशिवाय मुलांना डिजिटल शिक्षण देता येणार नसल्याचे लेखीसुद्धा काही संघटनांनी जि.प.ला दिले आहे.

Web Title: The need for trainers for digital school is on the shoulders of the Gram Panchayats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.