कल्याण परिमंडलातील सुमारे ९ लाख ग्राहकांनी थकवले १० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:20 PM2018-07-05T18:20:27+5:302018-07-05T18:20:33+5:30

चालू बिल थकीत असलेल्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश

Nearly 9 lakh customers in the Kalyan region have weighed 10 crore | कल्याण परिमंडलातील सुमारे ९ लाख ग्राहकांनी थकवले १० कोटी

कल्याण परिमंडलातील सुमारे ९ लाख ग्राहकांनी थकवले १० कोटी

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडलात घरगुती, व्यवसाईक व औद्योगिक असे एकूण सुमारे २८ लाख  ग्राहक आहेत. त्यापैकी जून महिन्यात फक्त १९ लाख ग्राहकांनी चालू बिल भरले असून सुमारे ९ लाख ग्राहकांनी चालू बिल थकवले आहे. सध्या महावितरणचे चालू महिन्यात सुमारे १० कोटी इतकी रक्कम थकली आहे. यामुळे कल्याण परिमंडलात झालेल्या आढावा बैठकीत मुख्य अभियंता रफीक शेख यांनी दोन महिन्याहून अधिक काळ चालू बिल थकवणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहे.

सध्या महावितरण मार्फत कल्याण परिमंडलामध्ये सुमारे २८ लाख ३९ हजार ग्राहकांना वीज सेवा पुरवली जाते. या ग्राहकांतील जून महिन्यात एकूण वापरलेल्या विजेचे बिल सुमारे ८७० कोटी रुपये इतके होते. यांपैकी सुमारे ९ लाख ग्राहकांनी सुमारे १० कोटी इतकी रक्कम थकवली आहे. याचबरोबर मे महिन्याचे चालू बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर जून महिन्यात कार्यवाही करण्यात आली असून यातील सुमारे १६ हजार ग्राहकांनी रिकनेक्शण चार्जेस भरून आपली वीज जोडणी पुन्हा करून घेतली आहे. म्हणूनच वाढत जाणारी थकबाकी लक्षात घेत कल्याण परिमंडल मध्ये पार पडलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्य अभियंता रफीक शेख यांनी दोन महिन्याहून अधिक काळ चालू बिल थकवणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत.

समांतर रीडिंगमुळे ग्राहकांना योग्य बिलिंग

याचबरोबर ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिलिंग होण्यासाठी महावितरणने समांतर रीडिंग घेण्याचे काम सुरु केले आहे. याचबरोबर चालू बिल थकीत असणाऱ्या ग्राहकाची वीज जोडणी तोडतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांचे रीडिंग घेतले जाणार आहे. यामुळे महावितरणला वीज जोडणी तोडलेल्या प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. याचबरोबर ग्राहकांना योग्य व अचूक बिल देणे शक्य होणार आहे. याचबरोबर महावितरणला मीटर रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडीट सुरु

 ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी महावितरणच्या प्रत्येक अधिकार्याच्या टेबलचे ऑडीट करण्यात येत असून यामध्ये महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिनस्त कार्यालयांना अनपेक्षितपणे भेटी देत आहेत. या भेटीत ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांना आवश्यकते पेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकार्यावर नियमानुसार कार्यवाही होणार आहे.

श्री.विश्वजीत भोसले
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी(प्रभारी)
कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण

Web Title: Nearly 9 lakh customers in the Kalyan region have weighed 10 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.