संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 10:24 PM2017-10-31T22:24:07+5:302017-10-31T22:24:17+5:30

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

Music House Pt Ram Marathe Smriti music commemoration commence | संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास प्रारंभ

संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास प्रारंभ

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. गायन, वादन, संगीत या शास्त्रीय कलांचा सुरेल मेळ साधणारा हा महोत्सव ४ नोव्हेंबर पर्यंत रंगणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. बासरी वादक पं. रोणु मुझुमदार व साथसंगत करणाऱ्या इतर कालकरांचा सन्मान पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करन्यात आला. 
     उद्घाटन सोहलळयाला सभागृह नेते नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाले, उपायुक्त संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी महेश राजदेेरकर, नगरसेवक संजय वाघुले, दिलीप बारटके, अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखेचे विद्याधर ठाणेकर व इतर उपस्थित होते. शुभारंभाचे सत्र दिल्लीच्या गायिका डॉ. मीता पंडित यानी गुंफले. त्यांनी राग केदारने कार्यक्रमाची सुरुवात केली. निवेदन नरेंद्र बेडेकर यानी केले. प्रा. पद्मा हुशिंग यानी कलाकारांची ओळख करून दिली.हे दूसरे सत्र पं. रोणु मुझुमदार यांच्या बासरी वादनाने गुंफले.
 या सोहळ्यात यंदा देशातील विविध कलाकारांचा सहभाग आहे. महोत्सवाचे दूसरे पुष्प बुधवार १ नोव्हेंबर रोजी गुंफले जाणार आहे. यात गायिका गौरी पाठारे यांचे गायन आणि कोलकत्त्याचे कलाका पं शुभंकर बॅनर्जी यांचे तबला वादन सादर होणार आहे. 

Web Title: Music House Pt Ram Marathe Smriti music commemoration commence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत