टँकरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:14 AM2019-01-21T04:14:46+5:302019-01-21T04:14:48+5:30

टँकरच्या धडकेत व्यावसायिक रिचर्ड डिसोजा (४६, रा. कोलशेत, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Motorbike dies in tanker | टँकरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

टँकरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

Next

ठाणे : टँकरच्या धडकेत व्यावसायिक रिचर्ड डिसोजा (४६, रा. कोलशेत, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात टँकरचालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील गादी व्यावसायिक जमील अन्सारी (३५, रा. भिवंडी, ठाणे) आणि रिचर्ड हे दोघे मोटारसाकलने घोडबंदर रोडने शनिवारी कोलशेतकडे जात होते. त्यावेळी विजय गार्डन सिग्नल येथे त्यांच्या उजव्या बाजूने आलेल्या एका टँकरने मागून धडक दिल्याने दोघेही कोसळले. या अपघातामध्ये रिचर्ड यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title: Motorbike dies in tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.