मुंब्य्रात साडेचार कोटी खर्चून बांधलेल्या एमएमव्हेली संकुलता फेरीवाल्यांचे होणार पुर्नवसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:16 PM2017-12-25T16:16:18+5:302017-12-25T16:18:47+5:30

साडेचार कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या मुंब्य्राती एमएमव्हेली संकुलात आता फेरीवाल्यांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत प्रशासनाने या बाबतचे निर्देश दिले.

MMWally conglomerate built at the cost of Millionaire, will be rehabilitated by hawkers | मुंब्य्रात साडेचार कोटी खर्चून बांधलेल्या एमएमव्हेली संकुलता फेरीवाल्यांचे होणार पुर्नवसन

मुंब्य्रात साडेचार कोटी खर्चून बांधलेल्या एमएमव्हेली संकुलता फेरीवाल्यांचे होणार पुर्नवसन

Next
ठळक मुद्देकौसामधील विस्थापितांचे एमएमव्हेली येथे पुनर्वसनमुंब्य्रातील १४५ गाळेधारकांचे तात्पुरते पुनर्वसन

ठाणे - रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या मुंब्य्रातील १४५ गाळेधारकांचे बाबाजी पाटील वाडी येथे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला आहे. तर कौसा परिसरातील विस्थापितांचे पुनर्वसन एमएमव्हेली येथील फेरीवाला संकुलात करण्यात येऊ शकते असेही यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे साडेचार कोटी खर्च बांधून तयार असलेल्या या संकुलात आता हे फेरीवाले विस्थापीत होणार आहेत. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात सोय होणार असली तरी या गाळेधारकांची कायमची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंब्य्रातील राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी केली आहे.
              मुंब्य्रातील गाळेधारकांचे पुर्नवसन करण्यात महापालिका प्रशासन आतापर्यंत अपयशी ठरल्याचा ठपका लोकप्रतिनिधींनी ठेवला आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात रस्ता रुंदीकरणाची मोठी मोहीम या वर्षी राबविण्यात आली होती. मुंब्रा तसेच दिव्यातही या मोहिमेंतर्गंत रस्ते रु ंंद करण्यात आले. मात्र फक्त मुंब्य्रात २५८ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले. त्यापैकी ११३ जणांचे पनर्वसन केले आहे. परंतु उर्वरित १४५ जणांचे पुनर्वसन शिल्लक असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. बाबाजी पाटील वाडी येथे १४० पत्र्याचे गाळे बांधून तेथे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असून मुंब्य्रातील ६० विस्थापितांची व्यवस्था एमएम व्हेली येथे करण्यात येऊ शकते अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान राष्टÑवादीच्या नगरसेविका अशरीन राऊत यांनी मात्र एमएम व्हेली येथे फेरीवाले जात नाही. तेथे रस्ता, दिवाबत्ती अन्य सुविधाच नसल्याचे सांगितले आहे. त्यावर सर्व सुविधा उपलब्ध करून पुनर्वसन करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
दरम्यान मुंब्य्रात रस्ता रुंदीकरणासाठी अनेक इमारती तोडल्या त्या विस्थापितांचे पुनर्वसन रेंटल स्कीमच्या घरात करण्यात आले. त्यांच्याकडून पालिका भाडे वसूल करते. ज्या विस्थापितांनी रस्ता रु ंदीकरणात हक्काची घरे दिली. त्यांचे कायमचे पुनर्वसन हे बीएसयूपीच्या घरात करावे अशी मागणी राष्टÑवादीने केली आहे. तसेच पारिसक रेतीबंदर येथील विस्थापितांची घरे ही वर्षानुवर्ष जुनी आहेत. त्यांचे पुनर्वसनही बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने सीआरझेडची जागा असल्याचे सांगितल्यानंतर मात्र विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी कळव्यातील सीआरझेड परिसरातील विस्थापितांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरात करणायत आले मग रेतीबंदर वासियांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला.




 

Web Title: MMWally conglomerate built at the cost of Millionaire, will be rehabilitated by hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.