मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:31 PM2018-10-07T16:31:00+5:302018-10-07T16:33:58+5:30

मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

Marathwada Janvikasan Parishad organized 71st Marathwada Mukti Din and Gaurav Saurav celebrations | मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा संपन्न 

मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा संपन्न 

Next
ठळक मुद्दे७१ वा मराठवाडा मुक्तिदिन व गुणगौरव सोहळा संपन्न पाच मान्यवरांचा ' मराठवाडा रत्न '  पुरस्कार देऊन सन्मान समृद्धी महामार्ग हा मराठवाड्याचा विकास करणारा महामार्ग ठरेल - एकनाथ शिंदे

ठाणे : मराठवाडा जनविकास परिषद ठाणे  या संस्थेच्या यांच्या वतीने  ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळ्याचे  गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल आवारे (क्रीडा ) , डॉ.  श्रीकांत बाबुळगावकर ( आरोग्य ) , प्रख्यात चित्रकार भास्कर खामकर ( कला) , एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ करणारे दत्ता बारगजे ( सामाजिक ) ,  देशपातळीवर होणाऱ्या आय . ए . एस स्पर्धापरीक्षेत महाराष्ट्रातून पहिला आलेला दिग्विजय बोडके ( शैक्षणिक ) आदी मूळ मराठवाड्यातील पाच मान्यवरांचा ' मराठवाडा रत्न '  हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला  .

      विविध परीक्षांच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव  करण्यात आला. तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने  'गौरवशाली मराठवाडा ' या मराठवाड्यातील सर्वांगीण प्रश्न व समस्यांचा आढावा घेणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अशोक हांडे दिग्दर्शित 'मंगलगाणी दंगलगाणी '  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्याच्या पाजविला दुष्काळ आहे . तिथे दृष्काळाबरोबर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे , शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळत नाही , पुरेसा पाऊस होत नाही . त्यामुळे तिथे ऑक्टोबर महिन्यातचं पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे मे  महिन्यात काय होईल असा प्रश्न उपस्थित होत असतो . असे असताना आजवर कोणत्याही सरकारने मराठवाड्याकडे लक्ष दिलेले नाही . अशी खंत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी  व्यक्त केली . मराठवाड्यात अनेक समस्या आहेत तरी देखील मराठवाड्यात राहणारे लोक सहनशील आहेत. त्यामुळे त्यांनी  धीर सोडलेला नाही . आज लातूर ही शिक्षणाची इंडस्ट्री झालेली असताना मात्र मराठवाड्यात इंडस्ट्रीसाठी कोणी अद्याप प्रयत्न केला नसल्याचे भिडे यांनी नमूद केले . माझा जन्म मूळ मुंबईचा असला तरी माझी पाळंमुळं ही मराठवाड्याती बीड जिल्ह्यात आहेत . त्यामुळे आज मला या कार्यक्रमाला येऊन  माहेरी आल्यासारखे वाटतं असल्याचे त्यांनी सांगितले.  माझे मराठवाड्यावर लक्ष असून सातत्याने मी मराठवाड्याबाबत माहिती घेत असल्याचे सांगत मी मराठवाड्याची आहे असे मी अभिमानाने सांगते असे भिडे म्हणाल्या. 


' ज्ञान ' हीच उद्याची शक्ती आहे त्यामुळे विविध उद्योगाच्या माध्यमातून मराठवाड्याचे उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे . असे प्रतिपादन माजी  मंत्री राजेश टोपे यांनी या वेळी बोलताना केले. या आधीचा काळ कसा होता यापेक्षा उद्याचा काळ कसा असेल यावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे टोपे यांनी नमूद केले. मराठवाड्यातील प्रतिकूल परिस्थितीवर मात  अनेकांनी मराठवाड्यातून मुंबई , ठाणे , नवीमुंबई , पुणे , नाशिक सारख्या विविध ठिकाणी स्थलांतर केले. त्यातील उच्च मध्यस्थ लोकांनी शिक्षण पूर्ण करत ते आज विविध ठिकाणी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत . त्यामुळे मराठवाडा ही अधिकाऱ्यांची भूमी असल्याचे मत टोपे यांनी व्यक्त केले . परिस्थिती माणसाला घडवत असून मराठवाड्याच्या मातीत व्यवसाय , उद्योग , प्रशासन आहे . मात्र आज या भागात  अनेक अडचणी आहेत परंतु त्यावर मात करत आपण ज्या भूमीतून आलो आहोत त्या भूमीला विसरू नका असा सल्ला त्यांनी यानिमिताने दिला. मराठवाडा मुक्तीसाठी आम्ही एक लढा लढलो , त्यात यशस्वी झालो मात्र मराठवाडा विकासाचा लढा तुम्ही सर्वानी एकत्र येऊन लढावा अशी अपेक्षा ९६ वर्षीय हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव नाईक यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली . यावेळी नाईक यांनी मराठवाडा जनविकास परिषद करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत परिषदेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभआशिर्वाद दिले. संस्थेचे महासचिव  तथा ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . मराठवाड्याचा विकास करण्यासाठी समृद्धी महामार्ग हा मराठवाड्याचा विकास करणारा महामार्ग ठरेल असा आशावाद राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला . मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त , आत्महत्याग्रस्त , होतकरू गरीब  तरुणांसाठी  वसतीगृह निर्माण करण्यासाठी  मराठवाडा जनविकास परिषदने सातत्याने माझ्याकडे  पाठपुरावा करावा , त्याबाबत आवश्यक ती सर्व मदत करण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला .   स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अनन्य साधारण महत्व आहे .भारताला एकसंध ठेवण्याचे काम मराठवाड्याने केले असून ' मराठवाडा मुक्तिसंग्राम ' हा देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान आहे  अशा भावना  शिंदे यांनी व्यक्त केल्या .  मी मराठवाडा जनविकास परिषदेच्या ठाणे शाखेचे काम सातत्याने पहिले असून मराठवाड्यातील बांधवांवर कोणतेही संकट आले कि मराठवाडा जनविकास परिषद जनतेच्या बाजूने उभी राहते असे नमूद करत शिंदे यांनी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले . मराठवाड्यात शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या या अत्यंत विदारक आहेत . मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे मराठवाड्यातून बांधव ठाणे शहरात स्थलांतरित झाले तर त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी  ग्वाही शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर   महापौर मीनाक्षी शिंदे , आमदार निरंजन डावखरे,विभागीय आयुक्त जगदीश पाटील ,कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके  ,मराठवाडा जनविकास परिषद ठाणे चे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे , आदी  उपस्थित होते.

Web Title: Marathwada Janvikasan Parishad organized 71st Marathwada Mukti Din and Gaurav Saurav celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.