डोंबिवलीत थालासिमियाग्रस्तांच्या मदतीला धावले मॅरेथाॅनपटू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 04:21 PM2018-03-04T16:21:49+5:302018-03-04T16:21:49+5:30

रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले.

Marathan player rushed to help Dombivli Thalasimiya victims | डोंबिवलीत थालासिमियाग्रस्तांच्या मदतीला धावले मॅरेथाॅनपटू 

डोंबिवलीत थालासिमियाग्रस्तांच्या मदतीला धावले मॅरेथाॅनपटू 

Next

डोंबिवली- रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली हजारो रोटरी क्लबनी मिळून गेल्या काही वर्षात पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला देशातून हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्युण्यामुळे आनुवंशिकतेतून पुढे जाणा-या थालासिमिया या रक्तविकाराला आटोक्यात आणण्याचा चंग रोटरी परिवाराने बांधला आहे. त्याच उद्दिष्टाने काल रविवारी, ४ मार्च २०१८ रोजी डोंबिवलीत रोटरी क्लब आॅफ डोंबिवली वेस्ट आणि कल्याण डोंबिवली रनर्स या संस्थाच्या माध्यमाने रन फॉर थालासेमिया प्रीव्हेंशन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

थालासेमिया प्रीव्हेंशन मोहीम यंदाचा थ्रस्ट एरिया असल्याचं रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी.शिवराज यांनी ठिकठिकाणच्या उपक्रमांमध्ये स्पष्ट केले आहे. थालासिमिया या विकाराबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर  जागरूकता निर्माण करणे आणि बाधित रुग्णाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दिलासा देणे हे आमचे उद्दीष्ट असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी दिली. काही वर्षांच्या कालावधीत थालासिमिया या विकाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकूल येथून संपन्न झालेल्या ५ कि.मी. व १० कि.मी. अशा दोन स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला आमदार रविंद्र चव्हाण वह रोटरीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर बक्षिस समारंभाला शिवसेनेचे रमेश सुक्र्या म्हात्रे उपस्थित होते.

स्पर्धेत खालिल स्पर्धक विजयी झाले.

खुला गट १० कि.मी.
पुरुष
१. ज्ञानेश्वर मोर्गा (३३.०९ मि)
२.उदेसिंग पगली (३४.०६ मि )
३. जगदिश गावडे (३६.४४ मि )
महिला
१. कविता भोईर (४४.१८ मि )
२. दिव्या पडवी ( ४६.५९ मि)
३. पूजा पडवी ( ४७.४६ मि)

४५ वर्षावरील गट
पुरुष
१. उपेंद्र प्रभू 
२. अशोक भारोवा 
३. दिपक सोनी

महिला
१. सुनिता टिक्कू 
२. मृणाल कुलकर्णी
३. शकुंतला वाघ

Web Title: Marathan player rushed to help Dombivli Thalasimiya victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.