बनावट सोन्याचे दागिने बनवून फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणा-या गुन्हेगारांना कळवा पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:43 PM2018-07-11T17:43:27+5:302018-07-11T17:43:35+5:30

सोन्याच्या दागिन्यांमध्ये चांदी मिसळणा-या आरोपींना अटक केली आहे.

Making fake gold ornaments, tell the criminals to finance the finance company and arrest the police | बनावट सोन्याचे दागिने बनवून फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणा-या गुन्हेगारांना कळवा पोलिसांकडून अटक

बनावट सोन्याचे दागिने बनवून फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणा-या गुन्हेगारांना कळवा पोलिसांकडून अटक

Next

ठाणे :- कोकणामध्ये लग्नात किंवा इतर समारंभात सोन्याचे पॉलिश केलेले दागिने घालण्याची काही जणांना सवय असते , तीन-चार तोळ्याच्या दागिन्यांमध्ये चांदी मिक्स करून त्यांचे दहा-बारा तोळे बनवून चारचौघात मिरवणाऱ्या लोकांसाठी बनावट सोनं बनवण्याचं काम रासबिहारी नीता इमन्ना वय 34 राहणार चिपळूण हा करत असे.

 व्यवसायाने सोनार असणाऱ्या रासबिहारी ईमन्ना याने शक्कल लढवत अशा प्रकारचे 1000 ग्रॅम वजनाचे दागिने बनवून ठेवले, त्यानंतर त्याने सुशांत साळवी (वय 35 रा. मनीषा नगर कळवा), लियाकत अब्दुल कादीर शेख (वय 43 ,रा. एरोली नवी मुंबई 3), अनिकेत चंद्रकांत कदम (वय 34, रा. चिपळूण रत्नागिरी) यांचा मध्यस्थी म्हणून वापर करून त्यांच्यामार्फत फायनान्स कंपन्यांकडे असे भेसळ केलेल सोनं गहाण ठेवून पैसे उचलत असे, उचललेली रक्कम ही गहाण ठेवलेल्या सोन्यापेक्षा जास्त असल्यामुळे परत सोने सोडवण्यासाठी जात नसत, मिळालेले पैसे आपापसात वाटून घेत असत, हे प्रकरण उघडकीस येण्यामागे कळवा येथील एक 420चा एक गुन्हा कारणीभूत ठरला, एका महिला तक्रारदाराने सुशांत निशिकांत साळवी या इसमाने आपल्याला 81 ग्रॅम वजनाचे दागिने 23 कॅरेट्स असल्याचे भासवित आपल्याकडून 1,70,000 हजार रुपये घेतले, काही दिवसांनी दागिन्यांची पडताळणी केली असता ते खोटे असल्याचे तिला समजले.

 त्याप्रमाणे तिने कळवा पोलीस स्टेशनमध्ये 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सुशांत साळवी याला ताब्यात घेतले असता, ह्यामध्ये चार जणांचे रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यामध्ये आरोपी रासबिहारी नीता इमन्ना याने चिपळूण येथील त्याच्या गावी 1000 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तयार केलेले होते, त्या पैकी 688 ग्रॅम वजनाचे सोने, पॉलीश केलेले सोन्याचे दागिने साथीदारांच्या मदतीने रत्नागिरी, मुंबई, ठाणे परिसरात एकूण 7 ठिकाणी फसवणूक करून मुथुट फायनान्स कळवा, नौपाडा, दादर , माझगाव, रत्नागिरी येथील लक्ष्मी बाळासाहेब नागरी सहकारी पतसंस्था, यादव राव घाग ग्रामीण शेती सहकारी संस्था अशा सोनं गहाण ठेवणाऱ्या संस्थांना बनावट सोन्याचे दागिने देऊन 13,45,000 /- रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. इमन्ना याच्या रत्नागिरी येथील गाळ्यातून 551 ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले बनावट दागिने व 1,50,000 रुपये रोख व बनावटीकरणाचे साहित्य 48 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत केल्याचे ठाणे परिमंडळ 1 उपायुक्त डॉ.स्वामी यांनी सांगितले.

Web Title: Making fake gold ornaments, tell the criminals to finance the finance company and arrest the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं