स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण करा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:36 AM2018-06-10T06:36:35+5:302018-06-10T06:36:35+5:30

ठाणे शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत

Make smart cities projects worthwhile | स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण करा  

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण करा  

Next

ठाणे - शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात शुक्रवारी आयोजित ठाणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पाचव्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अव्वर सचिव एस.व्ही.आर.रमण्णा, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे सीईओ तथा ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक मिलिंद पाटणकर, पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी, क्रि सिल कंपनीच्या सचिव कल्याणी ओक तसेच महापालिकेचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते. यावेळी ठाणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आधारित संपूर्ण शहरातील उपक्र म (पॅन सिटी) तसेच परिसर आधारित विकास (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) या दोन विभागांतील प्रकल्पांच्या संकल्पना-डिझाइनसंबंधित अभियंत्यांकड़ून चर्चा तसेच अभिप्रायासाठी सादर करण्यात आल्या. स्मार्ट सिटीअंतर्गत सामूहिक विकास योजनेसाठी विशेष फोरमच्या मदतीने नागरिकांच्या शंकांचे निरसन करून प्रसंगी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.ॉ

बसच्या येण्याजाण्याची वेळ कळणार

पॅन सिटीअंतर्गत येणाºया इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम या उपक्र मांतर्गत शहरातील विविध बसस्थानकांवर बसची येण्याजाण्याची निर्धारित वेळ प्रवाशांना समजेल, अशी रचना करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत सॅटीस येथे ही सुविधा सुरू केली आहे. लवकरच शहरातील सगळ्याच बसस्थानकांवर ती सुरू होणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. शहरात इन्टेक वायफाय सुविधा ठाणे महानगरपालिकेकड़ून देण्यात येते.

शहरातील ३८० ठिकाणी ८०० केबीपीएस स्पीडने ही वायफाय सुविधा कार्यान्वित असून याहीपेक्षा अधिक जलद वायफाय सुविधा येत्या दोन आठवड्यांत सुरू करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत जवळपास दोन लाखांहून अधिक वापरकर्ते या सुविधेचा लाभ घेत आहेत. शहरात ७८ सीसीटीव्ही कॅमेरे असून ४०० कॅमेरे बसवण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे. हे सर्व कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Make smart cities projects worthwhile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.