काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत पावणे दहा लाखाचा पानमसाला जप्त, भाईंदर पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 06:32 PM2017-11-29T18:32:13+5:302017-11-29T18:32:24+5:30

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती कार पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

Kashimira police seized 10 lakh of paanamas in Thane bound area, Bhinder police took action | काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत पावणे दहा लाखाचा पानमसाला जप्त, भाईंदर पोलिसांनी केली कारवाई

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत पावणे दहा लाखाचा पानमसाला जप्त, भाईंदर पोलिसांनी केली कारवाई

Next

मीरारोड :  काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती कार पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील माशाचा पाडा दर्ग्याजवळ मोठा प्रमाणात अनधिकृत बांधकामे पालिका अधिकारी व स्थानिक नगरसेवकांच्या आशिर्वादाने झाली आहेत. आदिवासींच्या तसेच ना विकास क्षेत्रातील या जमीनींवर झालेल्या बेकायदा बांधकामामधून बेकायदा धंदे वाढीस लागल्याचे समोर येत आहे.
सदर ठिकाणी मीना घाटाळ यांच्या एका बेकायदा बांधकामात मोठ्या प्रमाणात गुटखा सृदश बंदी असलेल्या पानमसाल्याचा साठा केला जात असल्याने व सदरचा माल चोरुन खाजगी कार मधुन मुंबई, ठाणे आदी भागात पुरवठा केला असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या निदर्शनास आली होती.
त्या अनुषंगाने पाटील यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक एस.एच.बिस्वास व त्यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले होते. मंगळवारी रात्री बिस्वास व पथकाने धाड टाकली असता तेथे तब्बल ६० गोण्यां मध्ये भरलेला मोठा साठा आढळुन आला. त्याची किंमत ९ लाख ६४ हजार इतकी आहे. सदर साठा जप्त करुन पोलीसांनी वाहतुकीसाठी वापरल्या जाणारया ३ कार जप्त केल्या आहेत. तर येथुन संतोष शंभुनाथ थटेरा (३८) , संदिप बनारसी थटेरा (२९) व निलेश राजेंद्रप्रसाद गुप्ता (३१) सर्व रा. भास्कर भवन, भाजी मार्केट, बाळाराम पाटील मार्ग, भार्इंदर या तीघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची नोंद करण्यात आली.
अन्न निरीक्षक यांनी जप्त बेकायदा पानमसाल्याचा साठा ताब्यात घेऊन त्याची नोंद केली असुन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यावर सदर साठा नष्ट करण्यात येईल. त्या नंतर सबंधित तीघां विरोधात खटला दाखल केला जाईल असे अन्न व औषध प्रशासनाच्या सुत्रां कडुन सांगण्यात आले.
सदरचा बेकायदा पानमसाला गुटखा सृदश असुन सदर गोदामात तो गुजरात व अन्य ठिकाणां वरुन चोरुन टॅम्पो वा ट्रकने आणला जायचा. व नंतर येथुन सर्वत्र त्याचा पुरवठा कार ने केला जायचा.





 

Web Title: Kashimira police seized 10 lakh of paanamas in Thane bound area, Bhinder police took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा