आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणची ठाण्यातून पुन्हा रायपूर कारागृहात रवानगी

By जितेंद्र कालेकर | Published: January 21, 2022 05:20 PM2022-01-21T17:20:52+5:302022-01-21T17:23:50+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्त व्य करणाºया कथित संत कालिचरण याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Kalicharan, who made an offensive statement, was sent back to Raipur Jail from Thane | आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणची ठाण्यातून पुन्हा रायपूर कारागृहात रवानगी

पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Next
ठळक मुद्देपोलीस कोठडीची मागणी फेटाळलीराजकीय हेतूने अटक झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्त व्य करणाºया कथित संत कालिचरण याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे त्याला पुन्हा रायपूरच्या कारागृहात ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या न्यायाधीश एस. व्ही. पाटील -मेटील यांनी शुक्रवारी दिले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण बाबाविरुद्ध २९ डिसेंबर २०२१ रोजी २९४, २९५, २९८ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रायपूर येथील धर्मसंसदेमध्ये कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले होते. या टीकेने त्याने देशवासियांचाही अवमान केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. गोडसेचे समर्थन करताना वाटेत येणाºयाना कापून टाकण्याची धमकीही पुण्यात दिल्याचा आरोप होता. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील यांच्या पथकाने रायपूर न्यायालयाच्या मार्फतीने रायपूर कारागृहातून १९ जानेवारी २०२२ रोजी कालीचरण याला ताब्यात घेतले. त्याला २१ जानेवारी रोजी ठाणे न्यायालयात हजर केले.
.................
ठाण्यात गुन्हाच घडला नाही...
नौपाडयात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे न्यायालयाचे अटक वारंट जरी नौपाडा पोलिसांनी आणले तरी संबंधित गुन्हा ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडला नसल्याचे कालीचरणचे वकील पप्पू मोरवाळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यातील फिर्यादी हे राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच राष्टÑवादीचे नेते असल्यामुळे हा गुन्हा पोलिसांवर दबाव आणून राजकीय हेतूने नौपाडयात दाखल केल्याचेही अ‍ॅड. मोरवाळे म्हणाले. त्याचवेळी कालीचरण यांच्या वादग्रस्त विधानाच्या चौकशीसाठी नौपाडा पोलिसांनी आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर संबंधित वक्त व्य हे रायपूर आणि पुण्यात केले. संबंधित ठिकाणी आरोपीला पोलीस कोठडी मिळाली होती. आरोपीकडून काहीही हस्तगत करायचे नाही. पुण्यात तर ते जामीनावर सुटले आहेत. रायपूरमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली. सर्व मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली.
----------------------------
कडक बंदोबस्तामध्ये पुन्हा रायपूरमध्ये-
ठाण्यातील अवघ्या अर्ध्या तासांच्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी पुन्हा कालीचरण याला कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस व्हॅनमधूनच रायपूर कारागृहात पुन्हा नेले.

Web Title: Kalicharan, who made an offensive statement, was sent back to Raipur Jail from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.