जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़

By मुरलीधर भवार | Published: March 12, 2024 07:44 PM2024-03-12T19:44:32+5:302024-03-12T19:44:40+5:30

KDMC News: मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांनी आज केले.

If the spirit of responsible citizen comes to everyone's mind, the speed of development will increase - Dr. Indurani Jakhar | जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़

जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़

- मुरलीधर भवार 
कल्याण- मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांनी आज केले.

"मेरा युवा भारत" या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि प्रेस क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने अत्रे रंगमंदिर येथे "महापालिका कामकाज व महापालिकेचा अर्थसंकल्प" या विषयाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यां समवेत आयोजिलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना महापालिका आुयक्तांनी उपरोक्त प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील ,मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त अर्चना दिवे ,धैर्यशील जाधव, अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव व उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत आदी उपस्थित होते. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्तांनी उत्तरे दिली.

लेखा वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक कसे तयार होते, त्यात काय तरतुदी असतात याचे विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केले. सर्व युवा वर्गाला एकमेकांशी जोडण्याकरीता "माय युवा भारत" हे डिजिटल व्यासपीठ सरकारने तयार केले आहे. युवा वर्गाने mybharat.gov.in रजिस्ट्रेशन करून मेरा युवा भारत या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन या उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव आणि महेश देशपांडे यांनी केले.

Web Title: If the spirit of responsible citizen comes to everyone's mind, the speed of development will increase - Dr. Indurani Jakhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.