अंजूरमध्ये घडतोय ऐतिहासिक अशोकस्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:52 AM2019-03-22T03:52:00+5:302019-03-22T03:52:26+5:30

ठाणे येथील कोर्टनाका परिसरात ठाण्याचे नाक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि मागील ३५ वर्षांपूर्वी अवजड वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झालेल्या ऐतिहासिक अशोकस्तंभाची आता नव्याने भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात मूर्तिकार श्रेयस खानविलकर हे निर्मिती करत आहेत.

Historical Ashoka Pillar is being constructed in Anjur | अंजूरमध्ये घडतोय ऐतिहासिक अशोकस्तंभ

अंजूरमध्ये घडतोय ऐतिहासिक अशोकस्तंभ

googlenewsNext

ठाणे - येथील कोर्टनाका परिसरात ठाण्याचे नाक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि मागील ३५ वर्षांपूर्वी अवजड वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झालेल्या ऐतिहासिक अशोकस्तंभाची आता नव्याने भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात मूर्तिकार श्रेयस खानविलकर हे निर्मिती करत आहेत. तो लवकरच ठाण्यात स्थानापन्न होणार आहे.
बाहेरगावहून ठाण्यात येणाऱ्या किंवा स्थानिक नागरिकांसाठी कोर्टनाक्यावर असलेला अशोकस्तंभ म्हणजे एक मैलाचा दगड होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात ठाणे कोर्टनाका आणि अशोकस्तंभ सुपरिचित होता. स्वातंत्र्यानंतर ठाण्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढा आणि शहिदांची आठवण म्हणून या स्तंभाची उभारणी १९५२ साली केली.
या कार्यात हातभार लावणाऱ्या ठाणेकरांची आणि याच ठिकाणी इंग्रज शिपायांचे आसूड अंगावर झेलणाºया देशभक्तांची चौथी पिढी आजही ठाण्यात वास्तव्यास आहे. संपूर्ण ठाणेकरांच्या भावना निगडित असलेल्या या अशोकस्तंभाला १९८३ च्या दरम्यान एका अवजड वाहनाने धडक दिली. यात तो उद्ध्वस्त झाला. त्यानंतर, आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर, भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात त्या स्तंभाचे काम सुरू आहे.

३२ फूट उंच स्तंभ
कोर्टनाका चौक नूतनीकरणासाठी ६० लाखांची तरतूद ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. सुमारे ३२ फूट उंच अशोकस्तंभ असून मूळ कलाशैलीचे भान राखण्यात आले आहे. या स्तंभाजवळच भारतीय राज्यघटनेची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे. तर, दुसºया कृत्रिम बेटावर तिरंगा हाती घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची प्रतिकृती उभारली जाणार आहे.

Web Title: Historical Ashoka Pillar is being constructed in Anjur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे