भिवंडीमध्ये कारखान्याच्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू

By Admin | Published: February 20, 2017 04:36 AM2017-02-20T04:36:46+5:302017-02-20T04:36:46+5:30

भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्यास रविवारी दुपारी सव्वाअकराच्या

Four workers died in factory fire in Bhiwandi | भिवंडीमध्ये कारखान्याच्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू

भिवंडीमध्ये कारखान्याच्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू

googlenewsNext

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत प्लास्टिक दाण्यापासून मोती बनविण्याच्या कारखान्यास रविवारी दुपारी सव्वाअकराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यात तीन महिलांचा समावेश आहे. दोन जखमी कामगारांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले आहे.
दापोडा येथील हरिहर कंपाउंडमध्ये देढिया प्लास्टिक कंपनीत प्लास्टिक दाण्यापासून कृत्रिम मोती बनविण्याचा कारखाना आहे. त्यामध्ये सुमारे १५ ते १७ कामगार काम करीत होते. येथे मोती बनविण्यासाठी रसायनाचा वापर होतो. या रसायनांच्या साठ्यास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजल्यानंतर कामगारांनी कारखान्याबाहेर धाव घेतली. काही क्षणांतच रसायन व प्लास्टिकच्या दाण्याने पेट घेत आगीने रौद्ररूप धारण केले. चारही बाजूने आगीने कारखान्यास वेढल्याने चार कामगार बाहेरच पडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलासह ठाणे, भार्इंदर व कल्याणहून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. चार तासानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर चार कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)

मृतांची नावे : सारिका अनंत दासरी (४५),निर्मला मधुकर जादूगर (३५), अनुराधा ज्ञानेश्वर निंबोले (२७) व मनोज (२०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Four workers died in factory fire in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.