लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील महिलेवर विदेशी नागरिकाचा अत्याचार, लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 08:49 PM2017-11-07T20:49:17+5:302017-11-07T20:49:29+5:30

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून पवई (मुंबई) येथील एका ४२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या वेन स्मिथ (५२, रा. सॅलफोर्ड, मॅन्चेस्टर, यू. के.) या परदेशी नागरिकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

A foreign citizen's torture on Thane woman showing betrayal of marriage, cheating of lakhs | लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील महिलेवर विदेशी नागरिकाचा अत्याचार, लाखोंची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील महिलेवर विदेशी नागरिकाचा अत्याचार, लाखोंची फसवणूक

Next

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून पवई (मुंबई) येथील एका ४२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या वेन स्मिथ (५२, रा. सॅलफोर्ड, मॅन्चेस्टर, यू. के.) या परदेशी नागरिकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आधी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयात खासगी तक्रार दिली. त्याच आधारे न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले.

तिच्यासोबत आॅगस्ट २०१५ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत लग्नाचे अमिष दाखवून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील एका इमारतीमध्ये आणि नेपाळ तसेच मँचेस्टर (इंग्लंड) आदी भागात वारंवार लैंगिक अत्याचार करून आर्थिक अडचण असल्याचे कारण दाखवून तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर नेपाळ येथे फिरायला जाण्याच्या निमित्ताने त्याने तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. या प्रकारानंतर वेन हा आपल्या मायदेशात परतला. वारंवार संपर्क करूनही त्याने दाद न दिल्याने पीडित महिलेने आधी कासारवडवली पोलीस ठाण्यात नंतर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल केला आहे.
........................
अशी झाली ओळख....
या महिलेची वेन स्मिथ या परदेशी नागरिकाबरोबर नाशिकच्या एका मठात ओळख झाली. तिथेच त्यांच्या गाठीभेटी झाल्या. ओळखीचे मैत्रित रुपांतर झाल्यानंतर नेपाळ आणि लंडनलाही ते एकमेकांसोबत गेले. मात्र, लग्न करण्याच्या नावाखाली त्याने तिची लैंगिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

 

Web Title: A foreign citizen's torture on Thane woman showing betrayal of marriage, cheating of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे