डोंबिवलीचा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 07:50 PM2019-05-21T19:50:48+5:302019-05-21T20:01:54+5:30

मध्य रेल्वेचे महापालिकेला पत्र * आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार रेल्वेचा निर्णय

The flyover of Dombivli's Kopar flyover will stop for transportation from May 27? | डोंबिवलीचा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी होणार बंद?

डोंबिवलीचा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी होणार बंद?

Next
ठळक मुद्देआयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.

डोंबिवलीडोंबिवली शहराला पूर्व पश्चिम जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूलाला डागडुजीची नितांत आवश्यकता असल्याने तो वाहतूकीसाठी २७ मे पासून बंद करण्यात यावा असे पत्र मध्य रेल्वेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लिहिले आहे. त्यामुळे हा पूल बंद झाल्यास त्याची दुरुस्ति कधीपासून सुरु होणार? किती दिवसांपर्यंत ते चालणार? तसेच ती डागडुजी कोण करणार या संदर्भात महापालिका प्रशासनाला कोणतेही तपशील माहिती नसल्याने डोंबिवलीकरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
१३ मे रोजी आयआयटीच्या तज्ज्ञांनी या संदर्भात सुरक्षा विषयक अहवाल मध्य रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानूसार रेल्वे प्रशानाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. येथील जाणकारांच्या माहितीनूसार १९८० दशकामध्ये हा उड्डाणपूल बांधण्यात आला. तेव्हापासून साधारणपणे दोन वेळा त्याची डागडुजी करण्यात आली होती. वरच्या भागातून जेथून वाहने जातात तेथे डांबरीकरणाचा रस्ता आहे. त्याठिकाणी डांबरीकरणाचे थर साठल्याने ते कमी करून पूलावरचे वजन कमी करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या काळात तो उपाय केला होता. त्यानंतर पूलाची संरक्षक भिंतींची डागडुजी, रेलींग आणि रंगरंगोटी अशी कामे करण्यात आली होती. मध्य रेल्वे प्रशासनानेही त्या पूलाचे लोखंड गंजू नये यासाठी काही वर्षांपूर्वी चंदेरी रंगकाम केले होते. पण फार मोठ्या प्रमाणावर गेल्या ३५ वर्षामध्ये काहीही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ते काम करावे लागणार असल्याने वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाळयाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला तर मात्र डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होणार असून लाखो नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. तसेच धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कल्याणचा पत्रीपूलाचे काम कूर्मगतीने होत असल्याने त्यात आता हा पूल काही दिवसांसाठी का होईना बंद होणार असेल तर नागरिकांनी वाहतूक कोंडीमध्येच लटकायचे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असून नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या पत्रासंदर्भात पुढे काय भूमिका घेणार यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी निवडणूक कामानिमित्ति आॅब्झरव्हर असल्याने विजयवाडा येथे व्यस्त असून यासंदर्भात नगररचना विभागातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करावी असे त्यांनी सांगितले. त्यानूसार नगररचनाकार सपना कोळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, डोंबिवलीच्या उड्डाणपूलासंदर्भात व्हाट्सअपवरच या संदर्भात पत्राची प्रत मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी यासंदर्भात बुधवारी पत्र पाठवणार आहे. त्यानूसार पूलामध्ये कोणते दोष आहेत? कुठे डागडुजी करावी लागणार आहे? ती रेल्वेने करायची की नाही? तसेच जोडरस्ते आहेत त्या ठिकाणी काही काम सुचवली असतील तर ती आमच्या माध्यमातून करायची का? त्या सगळयासाठी किती दिवसांचा अवधी लागणार आहे? किती निधी लागणार ही सर्व माहिती मागवली जाणार आहे. तसेच आयआयटी ने दिलेला अहवाल देखिल माहितीसाठी मागवून तज्ज्ञांची मते घेतली जाणार असल्याचे सांगितले.
यासंदर्भात वाहतूक नियंत्रण पोलीस निरिक्षक सतेज जाधव म्हणाले की, असे कोणतेही पत्र, सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या नाहीत. तसेच महापालिकेनेही संपर्क साधलेला नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु असून तेवढीच माहिती मिळाली आहे. पण संबंधित यंत्रणांकडून ठोस सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे आताच त्यासंदर्भात काहीही भाष्य करता येणार नाही असे ते म्हणाले.

ठाकूर्ली उड्डाणपूलाचा पर्याय
* जर हा पूल २७ मे पासून वाहतूकीसाठी बंद झाला तर पूर्व पश्चिम वाहनांना ये जा करण्यासाठी ठाकुर्ली येथील नव्या उड्डाणपूलाचा एकमेव पर्याय असेल.पण तो पूल टू लेन असून आधीच अरुंद आहे. त्यातच पूलाचे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दिशेने काम सुरु आहे.
 

Web Title: The flyover of Dombivli's Kopar flyover will stop for transportation from May 27?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.