समर्थ आर्केडमधील पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग, इमारत केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:14 PM2018-03-13T16:14:15+5:302018-03-13T16:14:15+5:30

उथळसर भागातील समर्थ आर्केडच्या पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी देखील बचावकार्य करतांना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

Fireworks, building seals, on the fifth floor of the developer's office in the competent arcade | समर्थ आर्केडमधील पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग, इमारत केली सील

समर्थ आर्केडमधील पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग, इमारत केली सील

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णालयातील सात रुग्णांना सुखरुप बचावलेइमारत केली गेली सील

ठाणे - उथळसर भागातील समर्थ आर्केड या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. याच इमारतीमध्ये एक हॉस्पिटल असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. इमारतीमधून सात रु ग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु बचाव कार्य करताना अग्निशमन विभागाचा एक जवान जखमी झाला. आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीम सोबत दोन फायर इंजिन, दोन बचाव पथके, एक पाण्याच्या टँकर सह घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांना दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही इमारत सील करण्याचे आदेश मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिले आहेत, त्यानुसार ही इमारत सील करण्यात आली आहे.
             उथळसर रोडवरील हॉलीक्र ॉस शाळेच्या समोरच समर्थ आर्केड ही पाच माजली इमारत आहे. याच इमारतीमधील पाचव्या मजल्यावर संजय भालेराव या विकासकाचे कार्यालयात आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास भालेराव यांच्या कार्यालयाला अचानक आग लागली. ही इमारत पूर्णपणे वाणिज्य वापरातील असून यामध्ये कोणीही रहिवासी राहत नाही. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथमेश हॉस्पिटल देखील आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्येच आपत्ती वव्यस्थापन विभागाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगमीमध्ये विकासक भालेराव यांच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर प्रथमेश हॉस्पिटलमधील दोन दिवसाच्या बाळाला सुखरूपपणे काढण्यात जवानांना यश आले. या दोन दिवसाच्या बाळाबरोबरच दोन रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमधील दोन कर्मचाºयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
         इमारतीच्या पाचच्या मजल्यावर जेव्हा आग लागली तेव्हा कार्यालय बंद होते. केवळ मोठ्या खिडकीमधून धूर निघत होता. त्यामुळे इमारतीमध्ये आग लागली असल्याचा अंदाज बांधून अग्निशमन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अग्निशमन विभागाचे जवान चंद्रकांत डवले हे मात्र आग विझवताना किरकोळ जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.

 

Web Title: Fireworks, building seals, on the fifth floor of the developer's office in the competent arcade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.