अग्निशमन दलाचे जवान गणवेशाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:52 AM2018-06-27T01:52:34+5:302018-06-27T01:52:37+5:30

मीरा- भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल सहा वर्षापासून गणवेश आणि तीन वर्षापासून रेनकोट मिळालेला नाही.

Fire brigade youth without uniform | अग्निशमन दलाचे जवान गणवेशाविना

अग्निशमन दलाचे जवान गणवेशाविना

Next

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन दलातील ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल सहा वर्षापासून गणवेश आणि तीन वर्षापासून रेनकोट मिळालेला नाही. शिवाय पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील ९०० कर्मचारी व १४० लिपिकांनाही दोन वर्षापासून रेनकोट, छत्रीसह गणवेश मिळालेला नाही.
अग्निशमन दलात आधीपासूनच अपुरे मनुष्यबळ आहे. सध्या नऊ अधिकारी व ८३ जवान कार्यरत आहेत. या शिवाय कंत्राट पध्दतीने अग्निशमक यंत्र, वाहने आदी चालवणारे ४५ चालक आहेत. मनुष्यबळ कमी असूनही अग्निशमन दलाचे जवान हे कसलीही पर्वा वा विचार न करता आपत्कालिन परिस्थितीत मदतकार्यासाठी नेहमीच पुढे असतात. तसे असताना या अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाºयांना सहा वर्षे झाली तरी अजूनही पालिकेने गणवेश दिलेला नाही.
विक्रमकुमार हे आयुक्त असताना त्यांनी जवानांना गणवेश दिले होते. सहा वर्षे गणवेश पालिका देत नाही. तर मागील तीन वर्षापासून पावसाळ्यासाठी जवानांना रेनकोटही दिलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना गणवेश व रेनकोट मिळत नसताना दुसरीकडे महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील ९०० कर्मचाºयांनाही दोन वर्षापासून पालिकेने पावसाळ्यासाठी रेनकोट दिलेला नाही.
शिवाय त्यांना दिला जाणारा गणवेशही मिळालेला नाही. पालिकेच्या १४० लिपिकांनाही मागील दोन वर्षापासून छत्र्या दिलेल्या नाहीत.
कामगार संघटनांनीही प्रशासनाकडे सातत्याने अग्निशमन दल, चतुर्थश्रेणी कर्मचारी व लिपिकांना त्यांचे गणवेश, रेनकोट, छत्री देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. पण अधिकारी वेळकाढूपणा व फुटकळ कारणे पुढे करून कर्मचाºयांवर अन्याय करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

Web Title: Fire brigade youth without uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.