भिवंडीत भीषण आग; 11 गोदामं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:09 PM2018-12-23T18:09:51+5:302018-12-23T18:21:17+5:30

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Fire breaks out in a godown in Bhiwandi | भिवंडीत भीषण आग; 11 गोदामं जळून खाक

भिवंडीत भीषण आग; 11 गोदामं जळून खाक

Next

ठाणे: भिवंडीतील भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत. गुंदवलीतील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली आहे. या आगीचा प्लास्टिकचे गिफ्ट्स आणि खेळण्यांच्या 11 गोदामांना बसला आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग विझवण्यासाठी 3 ते 4 तास लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे गुंदवली ग्रामपंचायत हद्दीत धुराचे लोट पसरले आहेत. 




भिवंडीतील आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भिवंडीतील गुंदवली भागात प्लास्टिक वस्तू, खेळण्यांची गोदामं आहेत. या गोदामांना आगीचा मोठा फटका बसला आहे. कांदिवलीतील दामूनगर भागातही आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. 


Web Title: Fire breaks out in a godown in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.