ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा आनंदोत्सवात दशकपूर्ती सोहळा संपन्न, ठाण्यातील कट्टयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 04:06 PM2018-03-28T16:06:49+5:302018-03-28T16:31:32+5:30

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा आनंदोत्सवात दशकपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी ठाण्यातील दहा कट्टयांचा सत्कार करण्यात आला. 

Felicitated in Thanhin Kattiyya, celebrating the decade-long celebration of Thane | ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा आनंदोत्सवात दशकपूर्ती सोहळा संपन्न, ठाण्यातील कट्टयांचा सत्कार

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा आनंदोत्सवात दशकपूर्ती सोहळा संपन्न, ठाण्यातील कट्टयांचा सत्कार

Next
ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयाचा आनंदोत्सवात दशकपूर्ती सोहळा संपन्नठाण्यातील दहा कट्टयांचा सत्कार *आनंदोत्सव* हा सुश्राव्य संगीत मैफलीचे आयोजन

ठाणे : ब्रह्मांड कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळा तर्फे सम्मेलन हॉल,  ब्रह्मांड फेज ५ येथे सुरोत्तमा प्रस्तुत *आनंदोत्सव* हा सुश्राव्य संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.  सदर कार्यक्रम सुवर्णा  दत्ता व उत्पल दत्ता यांनी सादर केला. 

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर,  ज्येष्ठ साहित्यक दाजी पणशीकर, चित्रकार विजयराज बोधनकर,  योगगुरु बापू भोगटे यांनी दिप प्रज्वलन करुन केली.  ठाणे शहर हे सांस्कृतिक उपराजधानी असून ठाणे शहकाचे नाव मोठे करण्यात अनेक संस्था व सजग नागरिकांचा सहभाग असतो अशा वेळी सांस्कृतिक चळवळ उभी करुन मोलाचे कार्य केले अशा अशा ठाण्यातील कट्टयांचा सत्कार ब्रह्मांड कट्टयाच्या पुढाकाराने सांस्कृतिक कार्य केल्याबद्दल ठाण्यातील दहा कट्टयांचा आमदार केळकर यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.  यामध्ये ठाण्यातील 

1)अत्रे कट्टा जिजामाता उद्यान ठाणे,  

2) अभिनय कट्टा जिजामाता उद्यान ठाणे, 

3) अत्रे कट्टा,  विजयनगरी,  वाघबीळ ठाणे, 

4) माहीती अधिकार कट्टा, ठाणे

5) अत्रे कट्टा,  दादलानी पार्क,  बाळकुम, ठाणे, 

6) अत्रे कट्टा,  श्रीरंग सोसायटी ठाणे

7) स्वराज्य कट्टा,  अष्टविनायक चौक,  ठाणे पूर्व

8) सांस्कृतिक कट्टा,  कळवा, 

9) मंथन कट्टा, कासारवडवली 

10) ब्रह्मांड कट्टा आझादनगर

यांचा समावेश होता. अत्रे कट्टयाच्या संपदा वागळे यांनी कट्टयेकरांच्या वतीवे समस्या मांडल्या व त्याचे लेखी निवेदन लवकरच दिले जाईल असे नमूद केले.  कट्टयेकरांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरच शासन- प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील व कट्टयेकरांची फेडरेशन स्थापन करण्यात येईल असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक व ब्रह्मांड कट्टयाचे विश्वस्त दाजी पणशीकर यांनी ब्रह्मांड कट्टयाचे माध्यमातून परिसरात चांगले सामाजिक सांस्कृतिक कार्ये होत असल्याचे समाधान व्यक्त करतांना कट्टयास शुभेच्छा दिल्या.  ब्रह्मांड कट्टयाच्या दशकपूर्ती सोहळ्या निमित्त सुरोत्तमा संगीत अँकडमी प्रस्तुत आनंदोत्सव प्रसिद्ध गायिका सुवर्णा दत्ता यांचे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाची सुरुवात राग यमन मधून बंदीशीने केली.  रामनवमीचे औचित्य साघून हरी मेरे जीवन प्राण आधार,  ठुमक ठुमक चलत रामचंद्र,  संत ज्ञानेश्वर यांचे अधिक देखणे तरी निरंजन पहाणे,  संत तुकाराम यांचे खेळ मांडीयेला वाळंवटी घाई , निरमय निर्गुण गुणरे गाऊगा हे निर्गुणी भजन सादर केले.  रसिक प्रेक्षकांचे आवडीचे बंगाली गीत बोंधु तीन दिन आणि दमा दम मस्त कलंदर ही गीते सादर करुन मंत्रमुग्ध केले.  सुवर्णा दत्ताच्या शिष्या पुजा व गीता यांनी रामचंद्र कृपाळू भज मन व ठुमक ठुमक चलत रामचंद्र हे गीते भजने सादर केली.  ज्योति शहाणे यांच्या सुंदर निरुपणाने कार्यक्रमात रंगत आणली.  संगीत मैफीलीला प्रेक्षकवर्ग व सुरोत्तमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिति होते.  आनंदोत्सव कार्यक्रमाची संगीत साथ तबल्यावर उत्पल दत्ता, हारमोनियम अभिजीत काथे,  बासरी हिमांशु गिंदे,  पखवाज ढोलक नानु पाटील तर साईट रिदम वर नयन यांनी साथ दिली.  ब्रह्मांड कट्टयाच्या दशकपूर्ती सोहळाला स्थानिकांची व मान्यवकांची तसेच विविध संस्थाच्या पदाधिकारी उपस्थित होते.  कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, डॉ. किरण मनेरा,  नगर सेविका कविता पाटील. कमल चौधरी, विभाग प्रमुख मुकेश ठुमरे,  हिरानंदानी शाखाप्रमुख प्रविण नागरे, ब्रह्मांडशाखा प्रमुख महेंद्र देशमुख तर  जिल्हाधिकारी ठाणे यांच्या पत्नी कला महेंद्र कल्याणकर,  जमाबंदी आयुक्त (स. सा.) पुणे यांच्या पत्नी निला जाधव तर अंबरनाथच्या मा. नगराध्यक्षा संपदा गडकरी उपस्थित होत्या.  सम्मेलन हॉल उपलब्ध करुन दिल्याबद्दल संजय  सिंग यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने नो प्लास्टिक बैग आव्हान लक्षात ठेवून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमास मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष महेश जोशी तर आभार प्रदर्शन संस्थापक राजेश जाधव यांनी केले.

Web Title: Felicitated in Thanhin Kattiyya, celebrating the decade-long celebration of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.