ठाण्यापुढील प्रवास होणार जलद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:45 AM2018-10-29T00:45:43+5:302018-10-29T00:46:03+5:30

पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम जून २०१९ पर्यंत; पन्नासहून अधिक लोकलफेऱ्या वाढणार

Fast forward to Thane will travel | ठाण्यापुढील प्रवास होणार जलद

ठाण्यापुढील प्रवास होणार जलद

ठाणे : मुंब्रा रेतीबंदर येथील उड्डाणपुलाचे आणि पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या कामासह उर्वरित इतर कामेही जून २०१९ पर्यंत होतील, असे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी रविवारी केलेल्या पाहणी दौºयातून स्पष्ट केले. या कामांमुळे ठाण्यापुढच्या रेल्वेस्थानकांसाठी आणखी ५० लोकलच्या फेºया दाखल होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जून २०१९ नंतर ठाण्याच्या पुढील प्रवास हा जलद आणि सोयीचा होणार आहे.

मुंब्रा रेतीबंदर येथे पाचव्या व सहाव्या मार्गिकांसाठी उड्डाणपुलाचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी ओहोटीच्या वेळी येथील जमीन पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे पाइलिंग रिग मशीन खाडीत पडली आणि त्या कामालाही धोका निर्माण झाला. त्याची पाहणी रविवारी खासदार शिंदे यांच्यासह एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केली. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेऊन पाइलिंगचे काम करावे, जेणेकरून भविष्यात प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. आवश्यक असेल तर खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून खाडीचे पाणी आत शिरून जमिनीला धोका निर्माण होणार नाही, अशा सूचना खासदारांनी एमआरव्हीसीच्या अधिकाºयांना केल्या. खारेगाव येथील रेल्वेच्या बोगद्यापासून मुंब्रा स्थानकापर्यंत सुमारे सव्वा किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येत असून यात ६५ पिलर्स उभारण्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. हा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेने आयत्यावेळी घेतला. त्यातच मूळ योजनेनुसार जुन्या बोगद्यालगत नवा बोगदा करण्यात येणार होता; परंतु त्यामुळे जुन्या बोगद्याला धोका निर्माण होईल, असे निष्पन्न झाल्यामुळे बोगद्याऐवजी रेतीबंदरमार्गे उन्नत मार्ग उभारून सध्याच्या मुंब्रा स्थानकाच्या पश्चिमेला हा मार्ग जोडण्याचा निर्णय घेतला. रेतीबंदरची जागा या प्रकल्पाला मिळावी, यासाठी खासदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ती जागा मिळाली. २०० मीटरमध्ये कांदळवनांचा भाग असून त्यासाठी वनविभागाची परवानगीही प्राप्त झाली आहे. उच्च न्यायालयाची मंजुरी मिळताच त्या भागातही कामाला सुरु वात होणार असल्याचे एमआरव्हीसीचे मुख्य प्रकल्प अधिकारी म्हस्के यांनी सांगितले.

Web Title: Fast forward to Thane will travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.