काँग्रेस-राष्ट्रवादीने दरोडे घातल्याने शेतक-यांनी आत्महत्या केल्या - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:46 PM2018-04-13T22:46:29+5:302018-04-13T22:46:52+5:30

मराठवाडा, विदर्भात कापूस पिकत होता. त्याचे मार्केटींग गेल्या पन्नास वर्षात झाले नाही. कापसावर प्रक्रिया करणा:या सूत गिरण्या या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या.

Farmers commit suicide by Congress-NCP brawl: Sadbhau Khot | काँग्रेस-राष्ट्रवादीने दरोडे घातल्याने शेतक-यांनी आत्महत्या केल्या - सदाभाऊ खोत

काँग्रेस-राष्ट्रवादीने दरोडे घातल्याने शेतक-यांनी आत्महत्या केल्या - सदाभाऊ खोत

Next

कल्याण - मराठवाडा, विदर्भात कापूस पिकत होता. त्याचे मार्केटींग गेल्या पन्नास वर्षात झाले नाही. कापसावर प्रक्रिया करणा:या सूत गिरण्या या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या. ज्या ठिकाणी जे पिकत होते. त्याठिकाणी त्याचे मार्केटींग करुन क्लस्टर निर्माण करायला हवे होते.   रोजगार उपलब्ध झाला असता  सरकारी अनुदानाच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीने कोटय़ावधी रुपये लाटत त्यावर दरोडा घातला. त्यामुळेच महाराष्ट्रात आत्महत्या वाढल्या असा आरोप सहकार खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केले. 

उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळ कल्याणच्या वतीने खडकपाडा येथील साई चौकात खांदेश फेस्टीवल-2018 चे उद्घाटन राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री निलिमा मिश्र, आमदार नरेंद्र पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापश्चात राज्यमंत्री खोत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त आरोप केला. खोत यांनी सांगितले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारी अनुदाने लाटत सहकारी सूत कारखाने हे त्यांच्या मतदार संघात उभे केले. त्यामुळे शेतक:याच्या मालाला योग्य हमी भाव मिळाला नाही. ज्या ठिकाणी पिकले त्या ठिकाणी त्याचे उत्पादन विकले गेले नाही. त्यातून दृष्टचक्र निर्माण झाले. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळला. शेतक:याला आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. 2008 साली 6 हजार 900 कोटी रुपयांची शेतक:यांना कजर्माफी दिली गेली. आजच्या घडीला सरकारने 23 हजार कोटी रुपयांची कजर्माफी दिली आहे. अजूनही काही शेतक:यांच्या खात्यात कजर्माफीची रक्कम जमा होत आहे. ज्या बँका शेतक:याच्या कर्जाची वसूली करण्यासाठी सक्ती करीत असतील त्यावर त्याना सक्ती करु नये असे सांगण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर सावकरी कर्ज असेल तर त्याच्या विरोधात सरकारकडे अथवा पोलिस ठाण्यात जाऊन शेतकरी तक्रार देऊ शकतात. त्याना तातडीने न्याय मिळेल. विदर्भातील सहा व मराठवाडय़ातील आठ ठिकाणी तसेच खांदेशातील जळगावात नानाजी देशमुख कृषी योजना लागू केली आहे. पाच हजार कोटीचा हा प्रकल्प आहे. आत्महत्या रोखण्यासाठी 2017 पर्यंत शेतक:यांना विजेचे कनेक्शन दिलेले आहे. तसेच या पुढे ऑगस्ट 2018 र्पयत विजेचे कनेक्शन दिले जाणार आहे. जलयुक्त शिवारामुळे राज्यातील शेती उत्पादन वाढले आहे. राज्य व केंद्राने शेतक:यांचे उत्पादन खरेदी केले आहे. गोडाऊन हाऊसफुल्ल झालेली आहेत. आत्ता खाजगी गोडाऊन घेऊन त्यात हे उत्पादन ठेवले जाणार आहे. निर्यातीला प्रोत्साहन देत शीतगृहे उभारण्यासाठी सरकार प्रयत्न शील आहे असे खोत यांनी सांगितले.

दरम्यान उत्तर प्रदेशात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी खाेत यांनी ही घटना खेदजनक आहे. या प्रकरणाची चाैकशी केंद्र व त्याठिकाणचे राज्य सरकार चाैकशी करेल. या घटना भविष्यात घडू नये असे मला वाटते अशी प्रतिक्रिया खाेत यांनी दिली आहे. 

Web Title: Farmers commit suicide by Congress-NCP brawl: Sadbhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.