प्रत्येक स्त्रीने स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे; अमृता फडणवीस यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 02:17 PM2018-03-22T14:17:35+5:302018-03-22T14:17:35+5:30

प्रत्येक स्त्रीने स्वत:वरील सर्व बंधने झुगारुन स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अस्त्र फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी मॅक्सस मॉल येथील बँक्विट हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात दिला. 

Every woman should be inspirational for herself with others; Advice from Amrita Fadnavis | प्रत्येक स्त्रीने स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे; अमृता फडणवीस यांचा सल्ला

प्रत्येक स्त्रीने स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे; अमृता फडणवीस यांचा सल्ला

googlenewsNext

भार्इंदर - प्रत्येक स्त्रीने स्वत:वरील सर्व बंधने झुगारुन स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अस्त्र फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी मॅक्सस मॉल येथील बँक्विट हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात दिला. 

माजी महापौर गीता जैन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अस्त्र फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी, प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही विशेष गुण असतो पण त्या संसारामध्ये स्वत:ला विसरुन जात असल्याने त्यांचा चांगला गुण समाजापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली. महिला सर्व क्षेत्रात अव्वल ठरत असुन त्याच आॅलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवितात, त्या वैमानिक पदावर कार्यरत आहेत, टि-व्टेंटी क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करतात, मंगला मणी नामक वैज्ञानिक महिला आंटार्क्टिकामध्ये उणे ९० डिग्री सेल्शियस तापमानात गेल्या एक वर्षापासून संशोधनाचे कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या अशा चमकदार कार्यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वयंरोजगारासाठी अधिकाधिक सरकारी योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच महिलांनी आपला संसार सांभाळून अस्त्र फाऊंडेशच्या आगामी अस्त्रस्त्रोत संस्थेत काम करुन स्वत:ची अर्थवृद्धी वाढवावी. जेणेकरुन महिलांना अर्थस्त्रोत उपलब्ध होण्याचा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना देत त्यातून त्यांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान अस्त्र फाऊंडेशनने महिलांसाठी ३ रुपये दराने उपलब्ध केलेल्या सॅनिटरी नॅपकीनसह काही वस्तूंचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
तसेच येत्या काही दिवसांत महिलांना अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना ई-स्कूटीचे वाटप करण्यात येणार आहे. त्याची चावी लाभार्थी महिलेला देत त्याचे प्रतिकात्मक उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॉलिवूड गायिका वैशाली सामंत यांच्या ‘लाल मेरी.....’ या गाण्यावर अमृता यांनी देखील सूर छेडला.
कार्यक्रमाला महिलांनी अनपेक्षित उपस्थिती दाखविल्याने सभागृहात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर काही महिला सभागृहाच्या बाहेरच बसुन कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. याप्रसंगी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ, मनिषा चौधरी, महापौर डिंपल मेहता, केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाच्या मंडळ सदस्या रानी द्विवेदी, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते,  ‘दिदि‘ या महिला संस्थेच्या संस्थापिका रेवती रॉय आदी उपस्थित होते. 

Web Title: Every woman should be inspirational for herself with others; Advice from Amrita Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.