‘आनंद’ तिकडे गेल्यानेच ‘श्रीकांत’ची राजकारणात एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:00 AM2019-04-01T05:00:05+5:302019-04-01T05:00:38+5:30

ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असून आजपर्यंत आपण अनेक कठीण निवडणुका जिंकलो आहोत, असे म्हणत शिंदे यांनी आजवर जिंकलेल्या उमेदवारांची नावे सांगायला सुरुवात केली.

Entry in the 'Shrikant' politics of 'joy' | ‘आनंद’ तिकडे गेल्यानेच ‘श्रीकांत’ची राजकारणात एण्ट्री

‘आनंद’ तिकडे गेल्यानेच ‘श्रीकांत’ची राजकारणात एण्ट्री

Next

डोंबिवली : माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची राजकारणात एण्ट्री झाल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभा महायुतीच्या मेळाव्यात रविवारी
केले.

ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असून आजपर्यंत आपण अनेक कठीण निवडणुका जिंकलो आहोत, असे म्हणत शिंदे यांनी आजवर जिंकलेल्या उमेदवारांची नावे सांगायला सुरुवात केली. बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून शिवसेनेतून दोनदा खासदार झालेले आनंद परांजपे यांचेही नाव निघाले. त्यांचे नाव तोंडातून बाहेर पडताच, क्षणभर थांबून ‘ ते जाऊ दे’ असं एकनाथ शिंदे म्हणाले; मात्र ते पुढे म्हणाले की, आनंद यांचीही पोटनिवडणूक आपण पाहिली. त्यावेळी ते नवीन होते. त्यांच्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतली; पण दुर्दैवाने नंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि म्हणूनच श्रीकांतची एण्ट्री झाली, असे शिंदे म्हणाले. यावेळी युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार सुभाष भोईर, महापौर विनीता राणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Entry in the 'Shrikant' politics of 'joy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.